कच्च्या तेलाच्या किंमतीत घट, भारताला अद्याप झळ कायम; देशांतर्गत अर्थव्यवस्थेला फटका

आज (शुक्रवारी) ब्रेंट क्रूडचे भाव प्रति बॅरेल 101 डॉलरवर पोहोचले आहेत. भारतासारख्या क्रूड ऑईलच्या (Crude oil) आयातप्रधान देशासाठी वाढते भाव चिंताजनक ठरू शकतात.

कच्च्या तेलाच्या किंमतीत घट, भारताला अद्याप झळ कायम; देशांतर्गत अर्थव्यवस्थेला फटका
ukrain russia crud oilImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 11:51 PM

नवी दिल्लीः रशिया-युक्रेन (Russia-Ukraine crisis) युद्धाचे पडसाद सर्व पातळ्यांवर जाणवत आहे. खाद्यपदार्थांपासून पेट्रोल-डिझेलच्या विक्रमी भाववाढीचे संकेत दिले जात आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचे विक्रमी टप्प्यापर्यंत पोहोचलेले भाव खाली उतरले आहेत. आज (शुक्रवारी) आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूडचे (Brent Crude) भाव गेल्या सात वर्षाच्या सर्वोच्च स्तरापेक्षा कमी झाले आहेत. मात्र, क्रूड तेलाचे भाव अद्यापही 100 डॉलर प्रति बॅरेलहून अधिकच आहे. आज (शुक्रवारी) ब्रेंट क्रूडचे भाव प्रति बॅरेल 101 डॉलरवर पोहोचले आहेत. भारतासारख्या क्रूड ऑईलच्या (Crude oil) आयातप्रधान देशासाठी वाढते भाव चिंताजनक ठरू शकतात. क्रूड तेल आयात करण्यासाठी गंगाजळीवर मोठा भार येऊ शकतो आणि राजकोषीय तूटीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलसोबतच गॅस भाववाढीची झळ सहन करावी लागेल.

तेलाचा तुटवडा, भाववाढीचा भडका

कच्च्या तेलाच्या भाववाढीला रशिया-युक्रेन संकटाच कारण सांगितलं जातं. रशियाच्या युक्रेनसोबतच्या संबंधामुळे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिका रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्याची शक्यता आहे. यामुळे तेल पुरवठ्यावर थेट परिणाम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेक राष्ट्रांनी प्रतिबंधात्मक मार्ग म्हणून इंधनाचे साठे करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

भारत युक्रेनचा आयातदार:

भारतातील युक्रेनियन दूतावासाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध आकडेवारीनुसार, 2020 मध्ये दोन्ही देशांमध्ये 2.69 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. युक्रेनने भारताला 1.97 अब्ज डॉलरची निर्यात केली, तर भारताने युक्रेनला 721.54 दशलक्ष डॉलरची निर्यात केली. युक्रेन भारताला घरगुती खाद्यतेल व इतर सामुग्री, अणुभट्टी आणि बाष्पवहनपात्र (Nuclear Reactors and Boiler) यांची निर्यात करतो. तर भारताकडून औषधी आणि इलेक्ट्रिकल साहित्याची खरेदी करतो.

निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचा भडका?

कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा थेट फटका पेट्रोल-डिझेलच्या किंमतीना बसण्याची दाट शक्यता आहे. सध्या भारतात पाच विधानसभा निवडणुकांच्या वारे वाहत असल्यामुळे येत्या दिवसात पेट्रोल-डिझेल सव्वाशेपार जाण्याचा अंदाज अर्थ जाणकरांनी वर्तविला आहे.

संबंधित बातम्या

GLOD RATE TODAY: महाराष्ट्रात सोन्याच्या भावात घसरण, 400 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या-आजचे भाव

SHARE MARKET UPDATE : : शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्समध्ये 1329 अंकाची तेजी; 8 लाख कोटींचा नफा

कोरोनापाठोपाठ भारतावर घोंगावतंय नवं संकट, देशाच्या चिंतेत वाढ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.