AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक डिसेंबरपूर्वी पटापट उरका ‘ही’ कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

दोन दिवसांनंतर डिसेंबर महिन्याला सुरुवात होत आहे. डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व असते. दरम्यान एक डिसेंबरपूर्वी यूएएनला आधार लिंक करणे अनिर्वाय आहे. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

एक डिसेंबरपूर्वी पटापट उरका 'ही' कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
ईपीएफओ
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 10:43 AM
Share

नवी दिल्ली : दोन दिवसांनंतर डिसेंबर महिन्याला सुरुवात होत आहे. डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व असते. डिसेंबरनंतर नव्या वर्षातील पहिल्या महिन्याला सुरुवात होते. साधारणपणे आपले आर्थिक वर्ष हे मार्चपर्यंत असते. त्यामुळे महत्त्वाच्या आर्थिक निर्णयाचे नियोजन त्या दृष्टीने करण्यात येते. मात्र डिसेंबर ते जानेवारी या काळात देखील काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असतात. जे की सामान्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या डिसेंबरमध्ये सामान्य नागरिकांशी निगडीत कोणते नियम बदलणार आहेत, त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊयात.

यूएएन-आधार  लिंकिंग 

ईपीएफओकडून पीएफसाठी यूएएन नंबरला आधार  कार्ड लिंक करण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पीएफ जमा करण्यात येणार नाही, असे ईपीएफओकडून सांगण्यात आले होते. दरम्यान यूएएन आधार लिंकिंगसाठी यापूर्वीच मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याची मुदत वाढवून एक डिसेंबर 2021 करण्यात आली होती. आता मुदत वाढ मिळण्याची अपेक्षा नसल्याने, तुम्हाला येत्या तीन दिवसामध्ये यूएएनला आधार लिंक करावे लागेल, अन्यथा तुमचा पीएफ खात्यात जमा होणार नाही.

सात लाखांचा विमाही जाईल

जर तुमचे आधार कार्ड यूएएनला लिंक नसेल तर तुमचे आणखी एक मोठे नुकसान होऊ शकते, एप्लॉईज डिपॉझिट लिंक्ड विम्यासाठी देखील ईपीएफओकडून आधार लिंक सक्तीचे करण्यात आले आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर विम्याचा हप्ता देखील रोखण्यात येईल, आणि तुम्हाला विम्यापासून वंचित राहावे लागू शकते.

इंधनाच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन कंपन्यांकडून इंधनाच्या किमतीचा आढावा घेऊन, नवे दर जाहीर केले जातात. त्यानुसार पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किमती बदलण्याची शक्यता आहे. सध्या जगात कोरोनाच्या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. परिणामी बाजार पेठेवर दबाव असून, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.

संबंधित बातम्या 

बँकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ‘आरबीआय’चा महत्त्वपूर्ण निर्णय; …तर होणार कारवाई

Omicron Effect: हा आठवडा शेअर बाजारासाठी कसा असणार? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स, आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.