बँक खात्यामध्ये नाहीत पैसे, तरीही करू शकता UPI पेमेंट, वाचा कसे?

आता तुम्ही म्हणाल, ऑनलाइन किंवा ऑफलाइन यूपीआयमार्फत पैसे भरण्यासाठी बँक खात्यात पैसे असले पाहिजेत. पण आज आम्ही तुम्हाला असा पर्याय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही बँक खात्यात पैसे नसले तरीही यूपीआय पेमेंट करू शकता आणि थकबाकीनंतर देऊ शकता.

बँक खात्यामध्ये नाहीत पैसे, तरीही करू शकता UPI पेमेंट, वाचा कसे?
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 8:33 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या या कठीण काळात अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशात यूपीआय युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface/UPI) ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. भारतात असलेल्या कोणत्याही यूपीआय अ‍ॅपमध्ये (UPI App) आपल्या बँक खात्याचा लिंक करून तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकता. आता तुम्ही म्हणाल, ऑनलाइन किंवा ऑफलाइन यूपीआयमार्फत पैसे भरण्यासाठी बँक खात्यात पैसे असले पाहिजेत. पण आज आम्ही तुम्हाला असा पर्याय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही बँक खात्यात पैसे नसले तरीही यूपीआय पेमेंट करू शकता आणि थकबाकीनंतर देऊ शकता. चला कसे ते जाणून घेऊया? (Digital payment No money in bank account you can still make UPI payment read how)

1) ICICI पे लेटर (ICICI PayLater) ICICI बँकेच्या पे लेटर अकाऊंटच्या माध्यमातून तुम्ही UPI क्यूआर कोट स्कॅन करून पैसे देऊ शकता. ही योजना एक प्रकारे क्रेडिट कार्ड सारखी आहे. पे लेटर अकाऊंटच्या माध्यमातून तुम्ही आधी पैसे खर्च करता आणि नंतर ते पैसे बँकेला परत करता.

कोणाला मिळणार ICICI PayLater सुविधा ही सर्व्हिस फक्त ICICI च्या ग्राहकांना देण्यात आली आहे. तुम्ही iMobile, पॉकेट्स वॉलेट किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून या सर्व्हिसचा फायदा घेऊ शकता. या खात्यामध्ये तुम्ही नोंदणी करताच तुम्हाला pl.mobilenumber@icici असा एक युपीआय आयडी आणि पे लेटर अकाऊंट नंबर मिळतो. या योजनेची खास बाब म्हणजे क्रेडिट सर्व्हिसचा वापर आता तुम्ही युपीआय व्यतिरिक्त इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही करू शकता.

धक्कादायक! टेरेसवर कॉफी पित असताना अंगावर वीज पडली, मुंबईत 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

ICICI PayLater ने कसं कराल पेमेंट पे लेटर अकाऊंटच्या माध्यमातून पेमेंट केलं जातं जेव्हा युपीआय किंवा ICICI इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून समोरचा व्यक्ति पैसे स्वीकारू शकतो. विशेष म्हणजे युपीआयच्या मदतीने तुम्ही अॅमेझॉन, पेटीएमस, मोबिक्विक, फ्यूचर पे, फ्लिपकार्ट, फोनपे असे मोठे पेमेंट अॅप वापरू शकता. या व्यतिरिक्त, यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही आसपासच्या छोट्या दुकानदारांना पैसे देऊ शकता. तर पे लेटर खात्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्ड बिलाचा पेमेंट किंवा पर्सन टू पर्सन (पी 2 पी) फंड ट्रान्सफर करू शकत नाही. (Digital payment No money in bank account you can still make UPI payment read how)

2) ई पे लेटर (epaylater ) epaylater नावाची स्टार्ट-अप आयडीएफसी बँकेने केली गेली आहे. यामध्येही तुम्ही यूपीआय आयडीद्वारे किंवा यूपीआय क्यूआर कोड स्कॅनद्वारे पैसे देऊ शकता. हे खातं कोणत्याही बँकेच्या ग्राहकाद्वारे वापरलं जाऊ शकतं.

फक्त 5 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय, प्रत्येक महिन्याला कमवाल बक्कळ पैसा

3) फ्लेक्सपे (Flexpay ) च्या ग्राहकांसाठी Scan Now and Pay Later ची सुविधा नुकतीच हैदराबादस्थित कंपनी व्हिफिफा इंडिया फायनान्सने (कंपनी Vivifi India Finance ) फ्लेक्सपे योजना सुरू केली असून यामुळे यूपीआयमध्ये क्रेडिटचा (Credit on UPI) पर्याय मिळू शकतो. फ्लेक्सपे ग्राहकनंतर कंपनीची थकबाकी भरू शकतात.

4) मनीटॅप (Moneytap) सीपीआयआय सुविधा फिनटेक कंपनीदेखील आपल्या ग्राहकांना मनीटॅप यूपीआय किंवा सीपीआयआयवर क्रेडिट देते. ग्राहक ऑनलाइन किंवा ऑफलाइन यूपीआय पेमेंटसाठी युपीआय पेमेंटचा वापर करू शकतात.

तुमच्याकडे आहे ही 10 रुपयांची नोट तर लगेच मिळतील 25 हजार, वाचा कसे?

(Digital payment No money in bank account you can still make UPI payment read how)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.