महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?

दुसरीकडे जीवनावश्यक खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. (Edible Cooking Oil Price)

महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?
खाद्यतेल दर
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 7:36 AM

मुंबई : देशभरात इंधन दरवाढीमुळे सर्वसामन्य हैराण झाले आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही महिन्यापूर्वी 500 ते 600 रुपये दराने मिळणारा पाच लिटर तेलाचा डबा हा आता हजार रुपये किंमतीने विकला जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. (Edible Cooking Oil Price Today)

घराघरात दैनंदिन वापरातला अविभाज्य घटक म्हणून तेल आणि तूप याकडे पाहिलं जातं. देवासमोरची दिवाबत्ती करण्यापासून ते दररोजचा स्वयंपाक करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी तेलाची गरज भासते. पण कोरोना काळात घरगुती वापरातील तेलाचा अक्षरक्षः भडका उडाला आहे. शेंगदाणा तेल, राईचे तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल आणि पामतेल या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. गेल्या मे महिन्यात या सहा प्रकारच्या तेलाची रिटेल किंमत 11 वर्षांत प्रथमच सर्वाधिक आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

खाद्यतेलाच्या किंमतीत अचानक वाढ का?

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्पादक देशांमधून खाद्यतेलाच्या पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भावातही खाद्यतेलाची मागणी कमी झालेली नाही. मागणी आणि पुरवठा यातील फरक वाढल्या या किमतीत वाढ होत आहे. अमेरिका आणि ब्राझीलसह काही देश खाद्यतेलाचा वापर बायोफ्युअल करण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे तेलाचा तुटवडा जाणवत आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

देशात होणारे खाद्यतेलाचे उत्पादन पुरेसे नाही. भारतात एकूण गरजेच्या केवळ 40 टक्के खाद्यतेलाचे उत्पादन होते. मागणी आणि पुरवठय़ातील दरी भरून काढण्यासाठी जवळपास 60 टक्के खाद्यतेल बाहेरील देशांतून आयात करावे लागते. तसेच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे देशातील तेलाच्या दरात वाढ झाली आहे.

वर्षभरात तेलाच्या दर किती वाढला?

देशातील विविध राज्यांत जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरले जाते. त्यानुसार, कन्झ्युमर अफेयर्स विभाग सहा प्रकारच्या तेलाचे दर निश्चित करतात. यात शेंगदाणा तेल, राईचे तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल आणि पामतेलाचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात या सर्व प्रकारच्या तेलाच्या दरात 20 ते 60 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सद्यस्थितीत तेलाचे दर काय? 

तेलाचे प्रकार – किंमत (5 लीटरप्रमाणे)

सोयाबीन तेल – 980 सूर्यफूल तेल – 1000 शेंगदाणा तेल – 959 राईचे तेल  – 980 पामतेल – 160 (एक लीटर)

(Edible Cooking Oil Price Today)

संबंधित बातम्या : 

लाखभर पगार असूनही बचत शून्य, जाणून घ्या गुंतवणूकीच्या सोप्या टिप्स

मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.