EPFO अलर्ट: नॉमिनी अपडेटसाठी अवघे काही दिवस, अन्यथा 7 लाखांवर पाणी!

PF नोंदणीकृत व्यक्तीला नॉमिनीच्या स्वरुपात एकाधिक व्यक्तींना समाविष्ट करण्याचा अधिकार असतो. एकाधिक व्यक्तींच्या बाबतीत व्यक्तिनिहाय भागीदारी निश्चित केलेली असते.

EPFO अलर्ट: नॉमिनी अपडेटसाठी अवघे काही दिवस, अन्यथा 7 लाखांवर पाणी!
ईपीएफओ
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 6:33 AM

नवी दिल्ली: तुम्ही EPFO सदस्य असल्यास तुमच्यासाठी महत्वाचा अलर्ट! तुमची नॉमिनी संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी अवघे सात दिवस शिल्लक आहेत. नॉमिनी अपडेटची डेडलाईन 31 डिसेंबरला संपणार आहे. तुम्ही नॉमिनी तपशील विहित वेळेत अपडेट न केल्यास अनेक सुविधांवर पाणी सोडण्याची वेळ येईल. यामध्ये पेन्शन तसेच इश्युरन्स सारख्या सुविधा समाविष्ट आहेत. पीएफ नोंदणीकृत व्यक्तिच्या मृत्यूनंतर केवळ नॉमिनीकडे पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्याचे अधिकार असणार आहेत.

PF नोंदणीकृत व्यक्तीला नॉमिनीच्या स्वरुपात एकाधिक व्यक्तींना समाविष्ट करण्याचा अधिकार असतो. एकाधिक व्यक्तींच्या बाबतीत व्यक्तिनिहाय भागीदारी निश्चित केलेली असते. नॉमिनी अपडेट करणे किंवा नव्याने जोडण्याचे आॕनलाईन स्वरुपात केले जाऊ शकते. यासाठी केवळ UAN नंबर असणे आवश्यक ठरणार आहे. तसेच आधार क्रमांक अकाउंट क्रमांकाला संलग्नित असणे अनिवार्य आहे.

EDLI स्कीमला नो एंट्री:

यंदाच्या वर्षी मे महिन्यात EPFO ने EDLI म्हणजेच एंप्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्सची मर्यादा 7 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. EDLI योजनेनुसार पीएफ नोंदणीकृत व्यक्तीची मृत्यू झाल्यास नॉमिनीला एकरकमी ही रक्कम प्राप्त होते. दरम्यान, पीएफ नोंदणीकृत व्यक्ती सेवेत असणे आवश्यक आहे.या योजनेनुसार किमान विमा रक्कम 2.5 लाख रुपये आहे.

नॉमिनी तपशील अपडेट स्टेप्स:

– EPFOच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या -‘लॉग-इन’ नंतर पाहा (View) पर्यायावर जा -प्रोफाईल वर क्लिक करा -तुमच्यासमोर दिसणारी सर्व माहिती पडताळा -व्यवस्थापित करा (Manage) पर्यायावर जा -ई-नॉमिनेशन पर्यायावर क्लिक करा -आवश्यकतेप्रमाणे तपशील भरा -माहितीपूर्ण भरल्यानंतर अस्वीकरणचा पर्यायावर क्लिक करा. कौटुंबिक तपशीलाचे पान उघडले जाईल -नॉमिनीचे नाव,पत्ता, संपर्क, वय, बँक तपशील,नातेसंबंध, फोटो याप्रमाणे माहिती सादर करा. -तुम्ही एकाधिक नॉमिनी जोडू इच्छित असल्यास (Add new) वर क्लिक करा -संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘सेव्ह करा’ वर क्लिक करा

इतर बातम्या:

Year End Sale : अॅपलच्या प्रॉडक्ट्सवर मिळवा घसघशीत सूट; 69,900 रुपयांना मिळणार iPhone 13!

किम शर्माचा लिएंडर पेस सोबत रोमान्स, Kiss करतानाचा फोटो झाला व्हायरल

Google Pay New Feature : ‘गुगल पे’मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं

EPFO Member must update nominee details by 31 dec 2021

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.