Flipkart वर 16 मार्चपासून धमाकेदार सेल, ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार मोठी सूट
नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर व्यतिरिक्त एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर 10% ची त्वरित सूट देखील दिली जाईल. तर चला त्या फोनबद्दल जाणून घ्या जे मोठ्या सवलतीत उपलब्ध असतील.
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर धमाकेदार ऑफर सुरू होणार आहे. हा सेल 16 मार्च ते 20 मार्च 2021 पर्यंत असणार आहे. यावेळी अनेक स्मार्टफोन सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर व्यतिरिक्त एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर 10% ची त्वरित सूट देखील दिली जाईल. तर चला त्या फोनबद्दल जाणून घ्या जे मोठ्या सवलतीत उपलब्ध असतील. (flipkart electronics sale from 16th to 20th march discount on smartphone including iphone 11 and poco x3)
46,999 रुपयांमध्ये iPhone 11
iPhone 11 स्मार्टफोन सेलमध्ये 46,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यावेळी फोनच्या 64 जीबी बेस मॉडेलची किंमत 51,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले, 12 एमपी + 12 एमपी ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप, 12 एमपीचा फ्रंट कॅमेरा आणि ए 13 बायोनिक प्रोसेसर मिळेल.
14,499 रुपयांमध्ये पोको एक्स 3
पोको एक्स 3 स्मार्टफोनचे 64 जीबी मॉडेल सध्या 16,999 रुपयांना विकले जात आहे, जे सेलमध्ये 14,499 रुपयात खरेदी करता येतील. फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले, 64 एमपी + 13 एमपी + 2 एमपी + 2 एमपी रीअर कॅमेरा सेटअप, 20 एमपी फ्रंट कॅमेरा, 6000 एमएएच बॅटरी, आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर आहे.
12,999 रुपयांमध्ये Samsung Galaxy A21s
फोनची 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. हा सॅमसंग स्मार्टफोन एचडी + रेझोल्यूशनसह 6.5 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. यात 48 एमपी + 8 एमपी + 2 एमपी + 2 एमपी रीअर कॅमेरा सेटअप आणि 13 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. इतकंच नाहीतर 5000 एमएएच बॅटरी आणि एक्सिनोस 850 प्रोसेसर देण्यात आला आहे.
8,990 रुपयांमध्ये LG K42
या फोनची किंमत 10,990 रुपये आहे. प्रीपेड ऑफरखाली 2000 हजार रुपयांची सूट दिली जाईल. हा स्मार्टफोन 6.6 इंचाचा एचडी + डिस्प्ले, 13 एमपी + 5 एमपी + 2 एमपी + 2 एमपी रीअर कॅमेरा सेटअप, 8 एमपी फ्रंट कॅमेरा, 4000 एमएएच बॅटरी आणि मीडियाटेक हेलियो पी 22 प्रोसेसरसह येतो. (flipkart electronics sale from 16th to 20th march discount on smartphone including iphone 11 and poco x3)
संबंधित बातम्या –
सावधान! गुगल क्रोमच्या Incognito मोडमध्येही तुमचा डेटा ट्रॅक होतो, कंपनीवर 3600 कोटींचा खटला
10000 हून कमी किंमत असलेल्या Realme च्या ‘या’ फोनवर 1000 रुपयांची सूट
Oppo लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार, सॅमसंग आणि गुगलही स्पर्धेत
Axis Bank ची कोट्यवधी ग्राहकांसाठी जबरदस्त सुविधा; ‘या’ उपकरणाद्वारे झटपट पैशांचे व्यवहार होणार
(flipkart electronics sale from 16th to 20th march discount on smartphone including iphone 11 and poco x3)