अर्थमंत्र्यांकडून ‘बुस्टर डोस’, 8 मोठ्या घोषणा, आरोग्य क्षेत्राला मोठा निधी

केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला आणि आरोग्य क्षेत्राला बुस्टर डोस दिलाय.

अर्थमंत्र्यांकडून 'बुस्टर डोस', 8 मोठ्या घोषणा, आरोग्य क्षेत्राला मोठा निधी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 5:02 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला आणि आरोग्य क्षेत्राला बुस्टर डोस दिलाय. त्यांनी आरोग्य क्षेत्राला मोठा निधी देताना 8 महत्त्वाच्या घोषणा केल्यात. सीतारमण म्हणाल्या, “आजच्या 8 उपाययोजनांमध्ये 4 उपाय नवे आहेत आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहेत. या अंतर्गत कोविडने प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम सुरू करण्यात येईल. या कर्ज योजनेत नॉन मेट्रो मेडिकल इंफ्रास्ट्रक्टरसाठी 50 हजार कोटी रुपये आणि अन्य दुसऱ्या सेक्टर्ससाठी 60 हजार कोटी रुपये क्रेडिट गॅरंटी देण्यात येईल (FM, Nirmala Sitharaman, economic relief, relief package, health sector, corona).

1. कोविडने प्रभावित क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम

कोविडने प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम सुरू करण्यात येईल. या कर्ज योजनेत नॉन मेट्रो मेडिकल इंफ्रास्ट्रक्टरसाठी 50 हजार कोटी रुपये आणि अन्य दुसऱ्या सेक्टर्ससाठी 60 हजार कोटी रुपये क्रेडिट गॅरंटी देण्यात येईल.

2. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मुदतवाढ

सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 रोजी लाँच करण्यात आली होती. ही योजना आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. या योजनेत सरकारने 22 हजार 810 कोटी रुपये गुंतवणूक केलीय.

3. 25 लाख जणांना MFI च्या माध्यमातून 1.25 लाखपर्यंतचं कर्ज

मायक्रो फायनान्स इंस्टिट्यूशन्सच्या (MFI) मदतीसाठी 25 लाख जणांना क्रेडिट गॅरंटी स्कीमची घोषणा करण्यात आली. हे कर्ज MCLR+2 टक्के दराने मिळेल. कर्जाचा कालावधी 3 वर्षे असेल. जास्तीत जास्त कर्ज घेण्याची मर्यादा 1.25 लाख रुपये असेल. यासाठी 7,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेचा लाभ 31 मार्च 2022 पर्यंत घेता येईल.

4. 11 हजार नोंदणीकृत टुरिस्ट गाईडसाठी नवी योजना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी 11 हजार नोंदणीकृत टुरिस्ट गाईडसाठी नवी घोषणा करण्यात आलीय. या योजनेत नोंदणीकृत संस्थांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची गॅरंटी देण्यात येणार आहे.

5. 5 लाख परदेशी पर्यटकांकडून विजा शुल्क नाही

भारतात परदेशी प्रवाशांना येण्यास परवानगी दिल्यानंतर पहिल्या 5 लाख परदेशी पर्यटकांना विजा शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. ही सूट 31 मार्च 2022 पर्यंत लागू असणार आहे.

6. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मुदतवाढ

सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 रोजी लाँच करण्यात आली होती. ही योजना आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. या योजनेत सरकारने 22 हजार 810 कोटी रुपये गुंतवणूक केलीय.

7. शेतकऱ्यांना खतांसाठी अतिरिक्त 15000 कोटींचं अनुदान

शेतकऱ्यांना प्रोटिन आधारित खतांवरील सबसिडीच्या रुपात अतिरिक्त 15,000 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे.

DAP आणि P&K फर्टिलायजरसाठी (खते) अतिरिक्त अनुदानाची (सब्सिडी) घोषणा करण्यात आलीय. या खरीप हंगामात 432.48 लाख मेट्रीक टन गहु खरेदी सरकारने केलीय. मागील वर्षी 389.92 लाख मेट्रीक टन गहु खरेदी केली होती. शेतकऱ्यांना यातून 85 हजार 413 कोटी रुपये देण्यात आले.

8. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आलीय. यानुसार मे ते नोव्हेंबर 2021 या काळात मोफत धान्य वितरण करण्यात येणार आहे. यासाठी 94 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे एकूण या योजनेवर 2.28 लाख कोटी रुपये खर्च होतील.

हेही वाचा :

“महाराष्ट्राच्या वाट्याचे थकित 24 हजार कोटींची भरपाई तातडीने करा”, जीएसटी परिषदेत अजित पवार आक्रमक

पेट्रोल डिझेलच्या जीएसटीमधील समावेशाबाबत केंद्राचा यू टर्न? पुढील 8 ते 10 वर्ष ‘हे’ शक्य नाही: सुशीलकुमार मोदी

Budget 2021 : पहिल्यांदाच नोकरदारांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही, वाचा सविस्तर…

व्हिडीओ पाहा :

संबंधित बातमी अपडेट होत आहे….

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.