अखेर ‘एनएसईच्या’ माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक; तीन दिवसांपासून सुरू होती चौकशी

'एनएसई' अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ (former chief executive officer) चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना सीबीआयने (Central Bureau of Investigation) अटक केली आहे. त्यांना दिल्लीमधून अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अखेर 'एनएसईच्या' माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक; तीन दिवसांपासून सुरू होती चौकशी
चित्रा रामकृष्ण
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 8:28 AM

‘एनएसई’ अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ (former chief executive officer) चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना सीबीआयने (Central Bureau of Investigation) अटक केली आहे. त्यांना दिल्लीमधून अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली आहे. ‘एनएसई’च्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणी चीत्रा रामकृष्ण यांची सेबीकडून देखील चौकशी सुरू आहे. व्यवहार अनियमितते प्रकरणात चित्रा रामकृष्ण यांची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे, त्यांच्या घराची झडती देखील घेण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता त्यांना सीबीआयच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान शनिवारी चित्रा रामकृष्ण यांच्या वतीने सीबीआय न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी देखील अर्ज करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

चौकशीला प्रतिसाद न दिल्याने अटक

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून चित्रा रामकृष्ण यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या घराची झडती देखील घेण्यात आली, मात्र त्यांच्याकडून चौकशीला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना अखेर अटक करण्यात आली आहे. शनिवारी रामकृष्ण यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र सीबीआय न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

साधूमुळे आल्या चर्चेत

‘एनएसई’चा व्यवहार एका साधूच्या आदेशानुसार चालतो असा खळबळजनक दावा चित्रा रामकृष्ण यांनी सेबीच्या चौकशीदरम्यान केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या प्रकरणात त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरू होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. एनएसईचा व्यवहार एका साधूच्या आदेशानुसार चालतो, या साधूला आपण वीस वर्षांपूर्वी भेटल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच आम्ही इमेलच्या माध्यमातून एकोंएकांच्या संपर्कात आहोत आसा दावा देखील चित्रा रामकृष्ण यांनी केला होता.

संबंधित बातम्या

आमदनी अठन्नी खर्चा रुपैया; ‘असं’ ठेवा वाढत्या खर्चावर नियंत्रण

घर खरेदी करायचंय? मग ‘असे’ करा पैशांचे नियोजन; अतिरिक्त आर्थिक ताण टाळा

महागाई आणखी भडकणार! जीएसटीचा सर्वात कमी स्लॅब आठ टक्के करण्याचा विचार; ‘या’ वस्तू होऊ शकतात महाग

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.