AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF खात्यातून कोट्यवधींची फसवणूक, 817 बँक खात्यांचा वापर, तुमचे खाते तर नाही ना?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) मुंबई कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधातून 21 कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, कॉमन पीएफ पूलद्वारे फसवणूक करण्यात आलीय. यापैकी सुमारे 21 कोटी रुपये काढण्यात आलेत.

PF खात्यातून कोट्यवधींची फसवणूक, 817 बँक खात्यांचा वापर, तुमचे खाते तर नाही ना?
पीएफ
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 7:11 AM

नवी दिल्ली: देशभरात कोरोना साथीदरम्यान पीएफ कार्यालयात कोट्यवधींची फसवणूक झालीय. मार्च 2020 ते जून 2021 दरम्यान कोरोना महामारी देशभरात वेगाने पसरत होती. त्यावेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) मुंबई कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधातून 21 कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, कॉमन पीएफ पूलद्वारे फसवणूक करण्यात आलीय. यापैकी सुमारे 21 कोटी रुपये काढण्यात आलेत.

घोटाळ्याचा “मास्टरमाईंड” मुंबई कांदिवली ईपीएफओ कार्यालयाचा 37 वर्षीय अधिकारी

आतापर्यंत केलेल्या तपासानुसार घोटाळ्याचा “मास्टरमाईंड” मुंबई कांदिवली ईपीएफओ कार्यालयाचा 37 वर्षीय अधिकारी चंदन कुमार सिन्हा असल्याचे सांगितले जातेय, ज्याने पीएफ दावा करण्यासाठी स्थलांतरित कामगाराच्या 817 बँक खात्यांचा कथितपणे गैरवापर केला होता. या पीएफ खात्यातून एकूण 21.5 कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आलीय.

फसवणुकीमध्ये 5 कर्मचारी सहभागी

सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या पैशांपैकी 90 टक्के रक्कम काढण्यात आल्याचं तपासात उघड झालंय. याशिवाय मुंबई कार्यालयातील 5 कर्मचारी या फसवणुकीमध्ये सामील आहेत, त्यापैकी चंदन सिन्हा फरार आहेत. सूत्रांनी सांगितले की, अंतर्गत लेखापरीक्षण पूर्ण होताच ईपीएफओ प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाणार आहे.

एसएमएसद्वारे बॅलन्स रक्कम तपासा

जर तुमचे UAN EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या ताज्या योगदानाची आणि PF शिल्लक माहिती एका मेसेजद्वारे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. जर तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे. हा एसएमएस यूएएनच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून पाठवावा.

मिस्ड कॉलद्वारे अशा प्रकारे बॅलन्स तपासा

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 ला मिस्ड कॉल द्या. यानंतर तुम्हाला EPFO ​​कडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या PF खात्याचा तपशील मिळेल. यासाठी बँक खाते, पॅन आणि आधार यूएएनशी जोडलेले असणे आवश्यक आहे. या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

EPFO द्वारे बॅलन्स तपासा

ईपीएफओ कर्मचारी उमंग अॅपद्वारे त्यांचे पीएफ खात्यातील शिल्लक देखील तपासू शकतात. ईपीएफ पासबुक पाहण्याव्यतिरिक्त आपण दावा करू शकता. हे एक सरकारी अॅप आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही अनेक वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या फोनवर डाऊनलोड करून त्याची नोंदणी करावी लागेल.

> यासाठी तुम्हाला EPFO ​​कडे जावे लागेल. >> येथे कर्मचारी केंद्रित सेवांवर क्लिक करावे लागणार आहे. >> आता पासबुकवर क्लिक करा. >> पासबुक पाहण्यासाठी तुम्हाला UAN सह लॉगिन करावे लागेल

वेबसाईटद्वारे बॅलन्स तपासा

तुम्ही ईपीएफओ वेबसाईटद्वारे बॅलन्स देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला EPFO ​​पासबुक पोर्टलवर जावे लागेल. आता तुम्हाला तुमच्या यूएएन आणि पासबुकने लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्हाला डाऊनलोड व्ह्यू पासबुक या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

संबंधित बातम्या

खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार, 2000 ऐवजी 4000 मिळणार, सरकारची नेमकी योजना काय?

पोस्टाच्या ‘या’ योजनेतून मॅच्युरिटीपूर्वी कधीही पैसे काढू नका, 48% व्याजाचं नुकसान

Fraud of crores from PF account, use of 817 bank accounts, isn’t it your account?

भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.