सर्व जगातच इंधनाचे दर वाढले, अमेरिकेत पेट्रोलच्या भावात 55 टक्क्यांची वाढ; इंधन दरवाढीवर सरकारचे स्पष्टीकरण
आज पेट्रोल. डिझेलची वाढत असलेली किंमत आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भारतात वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना अमेरिका आणि ब्रिटनसोबत केली आहे.
पेट्रल (Patrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती सातत्याने वाढतच आहेत. गेल्या 22 मार्चपासून इंधनाच्या (fuel) किमतीध्ये तब्बल 9.20 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पंधरवाड्यात केवळ 24 मार्च आणि 1 एप्रिल असे दोनच दिवस भाव स्थिर होते. हे दोन दिवस वगळता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दरम्यान आज पेट्रोल. डिझेलची वाढत असलेली किंमत आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भारतात वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना अमेरिका आणि ब्रिटनसोबत केली आहे. त्यांनी यावेळी म्हटले की, भारतात इंधनाचे दर वाढत आहेत, ही खरी गोष्ट आहे. मात्र अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत त्यामध्ये अत्यंत कमी वाढ होत आहे. देशात इंधनाच्या किमती गेल्या काही दिवसांमध्ये केवळ पाच टक्यांनी वाढल्या आहेत. तर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इंधनाचे दर 50 ते 55 टक्क्यांनी वाढले आहेत.
नेमकं काय म्हणाले पुरी?
केवळ भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये इंधनाच्या दरामध्ये वाढ होत आहे. भारतामध्ये इंधनाच्या दरामध्ये अवघी पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र आपण जर जगातील प्रमुख देशांच्या इंधन दरवाढीचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की, एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत पेट्रोलची किंमत अमेरिकेत 51 टक्क्यांनी वाढली आहे, कॅनडामध्ये 52 टक्के, जर्मनीमध्ये 55 टक्के, फ्रान्समध्ये 50 टक्के, स्पेनमध्ये 58 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामानाने भारतामध्ये करण्यात आलेली इंधन दरवाढ ही किरकोळ आहे. पुरी लोकसभेत विचारेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
दोन आठवड्यात इंधनाच्या दरात 9.20 रुपयांची वाढ
गेल्या दोन आठवड्यामध्ये इंधनाच्या दरात पेट्रोलिय कंपन्यांनी तब्बल 9.20 रुपयांची वाढ केली आहे. गेल्या पंधरवाड्यात केवळ 24 मार्च आणि 1 एप्रिल हे दोनच दिवस असे होते, की या दिवशी कोणतीही इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती. हे दोन दिवस वगळता 22 मार्चपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पेट्रोल 9.20 रुपयांनी महागले आहे. इंधनात दरवाढ झाल्याने महागाईने उच्चांक गाठला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने अन्नधान्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. महागाईचा मोठा फटका सर्वसामान्य व्यक्तींना बसत आहे.
संबंधित बातम्या
SHARE MARKET: शेअर बाजारात नफेखोरी, सेन्सेक्स गडगडला; 435 अंकांची घसरण
Semiconductor crisis: सेमीकंडक्टरचा तुटवडा वाहन उद्योगाच्या मुळावर, वाहन विक्रीत मोठी घट
IIT Kanpur : बापरे बाप! शंभर कोटींची गुरुदक्षिणा, कोण आहे देणगी देणारा कोट्यधीश विद्यार्थ्यी?