अचानक सोने-चांदीचे दर कोसळले, आता 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर नेमका किती?

दिवाळीत सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 700 रुपयांनी आणि 24 कॅरेट 770 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 18 कॅरेट सोन्यातही घट झाली आहे. चांदीच्या दरातही प्रतिकिलो 3000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

अचानक सोने-चांदीचे दर कोसळले, आता 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर नेमका किती?
सोने आणि चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 8:41 PM

सोने आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या दरात आज अचानक घसरण झाली आहे. विशेष म्हणजे ऐन दिवाळीत सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही सोने, चांदी खरेदीचा विचार करत असाल तर सर्वात आधी 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, ते जाणून घेऊयात. दरम्यान, देशभरात गेल्या चार दिवांपासून दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक जण सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे सराफ बाजारात या दिवाळीत चांगलीच गर्दी बघायला मिळाली. दिवाळीच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात चांगलीच तेजी बघायला मिळाली होती. अर्थात सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उतार-चढाव येत आहेत. पण आज भाऊबिजेच्या दिवशी तेजित असणारे सोने-चांदीचे दर खाली घसरले आहेत. त्यामुळे सोने, चांदीची खरेदी करु इच्छुक ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

22 कॅरेट सोन्याची किंमत किती?

22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळे (10 ग्रॅम) 700 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे 22 कॅरेट एक तोळे सोन्याची किंमत 74000 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट म्हणजेच 10 तोळे सोन्याची किंमत आता 7,40,000 रुपये इतकी झाली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत किती?

22 कॅरेट सोन्याच्या दरापेक्षा 24 कॅरेट सोन्याच्या दरात काहीशी जास्त घसरण झाली आहे. 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 770 रुपयांनी घसरण झाली आहे. तरीही 24 कॅरेट सोन्याचा दर हा 22 कॅरेटपेक्षा जास्तच आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 80,710 इतकी आहे. दरम्यान, 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याची किंमत ही 7700 रुपयांनी घसरली आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,07,100 रुपये इतकी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

18 कॅरेट सोन्याच्या दरातदेखील घसरण

दरम्यान, 18 कॅरेट सोन्याच्या दरातदेखील आज घसरण झाली. 18 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 570 रुपयांनी घसरले. त्यामुळे 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 5700 रुपयांनी घसरली आहे. परिणामी 18 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याची किंमत ही 6,05,500 रुपये इतकी झाली आहे.

चांदीची किंमत किती?

चांदीच्या किंमतीतही आज घसरण झाली आहे. प्रतिकिलो चांदीच्या दरात 3000 रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीचा तर सध्या 97,000 रुपये प्रतिकिलो आहे. 100 ग्रॅम सोन्याच्या दरात आज 300 रुपयांनी घटली आहे. त्यामुळे ती किंमत 9700 रुपयांवर येऊन पोहोचली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.