Gold rate: आठवड्यात सोन्याच्या दरात 1350 रुपयांची घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव
आठवड्याच्या चढ-उतारानंतर देशात सोने तसेच चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ऑक्टोबर डिलिव्हरीसाठीचे सोने 952 रुपयांच्या घसरणीसह (Gold rate today) 46651 रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले.
मुंबई : आठवड्याच्या चढ-उतारानंतर देशात सोने तसेच चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ऑक्टोबर डिलिव्हरीसाठीचे सोने 952 रुपयांच्या घसरणीसह (Gold rate today) 46651 रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले. तर डिसेंबर डिलिव्हरीसाठी असलेले सोने 998 रुपयांच्या घसरणीसह 46810 रुपये तसेच फेब्रुवारी 2022 डिलिव्हरीसाठीचे सोने 714 रुपयांच्या तेजीसह 48740 रुपये प्रति दहा ग्रॅम रुपयांवर स्थिरावले. (Gold and Silver prices this week know all details in Marathi)
मागील आठवड्यात सोन्याचा दर 48001 रुपये प्रति दहा ग्रॅमवर (Gold price today) बंद झाला होता. मागील आठवड्याच्या तुलनेत सध्याच्या आठवड्यात सोन्याच्या भावात 1350 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शेवटच्या दिवशी सोने 45.40 डॉलर्सच्या घसरणीसह (2.51 फीसदी) 1763.50 डॉलर प्रति औंसवर स्थिरावले. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात 55 डॉलर्सची घसरण झाली.
चांदीच्या दराची काय स्थिती ?
या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (Silver latest price) चांदीच्या दरामध्येसुद्धा मोठी घसरण पाहायला मिळाली. सप्टेंबर डिलिव्हरीसाठीच्या चांदीमध्ये 2023 रुपयांची घसरण झाली. तसेच 2023 रुपयांच्या घसरणीसह सप्टेंबर डिलिव्हरीच्या चांदीचा दर 64,975 रुपये प्रति किलोवर स्थिरावला. मागील आठवड्यातील चांदीचा दर 67847 रुपये होता. मागील आठवडा आणि सध्याचा आठवडा यांची तुलना केली तर या आठवड्यात चांदीच्या भावात 2872 रुपयांची घसरण झाली. डिसेंबर डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव 65800 रुपये प्रति किलोवर स्थिरावला. यामध्ये एकूण 2054 रुपयांची घसरण झाली.
सराफा बाजारवरसुद्धा दबाव
सोन्याच्या दरामध्ये या आठवड्यात चढउतार झाल्यामुळे सराफा बाजारावरसुद्धा याचा परिणाम पाहायला मिळाला. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात 283 रुपयांची घसरण झाली. या घसरणीसह दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर 46,570 प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 661 रुपयांची घसरण झाल्याने प्रति किलो चांदीचा भाव 65,514 राहिला.
IBJA वर सोने-चांदीची स्थिती काय ?
IBJA वर दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा क्लोजिंग रेट 47647 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. मागील आठवड्यात हा दर 48430 रुपये होता. मागील आठवड्याच्या तुलनेत IBJA वर सोन्याच्या भावामध्ये 783 रुपयांची घसरण झाली. तर चांदीचा क्लोजिंग रेट 66727 रुपये राहिला. मागील आठवड्यात चांदीचा दर 68053 रुपये होता. मागील आठवड्याच्या तुलनेत IBJA वर चांदीच्या दरात 1326 रुपयांनी घसरण झाली.
इतर बातम्या :
तुमच्याकडेही एअरटेल सिम असल्यास मिळणार 4 लाखांचा लाभ, जाणून घ्या कसा?
खूशखबर! सरकार मोफत गॅस कनेक्शन देणार, कोणत्याही पत्त्यावर घेता येणार, नियम काय?
शेअर बाजारात येतोय आदित्य बिर्ला सनलाईफचा IPO, गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी
(Gold and Silver prices this week know all details in Marathi)