AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा सोनं, 5 फेब्रुवारीपर्यंत सरकारची खास योजना

सोनं आता 7000 रुपयांहून जास्त स्वस्त झालं आहे. अशात जर तुम्हाला आणखी स्वस्तामध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर सरकारने तुमच्यासाठी एक ऑफर आणली आहे.

50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा सोनं, 5 फेब्रुवारीपर्यंत सरकारची खास योजना
gold silver price
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 8:47 AM

नवी दिल्ली : शेअर बाजारातील तेजी वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. कारण, सोनं आता 7000 रुपयांहून जास्त स्वस्त झालं आहे. अशात जर तुम्हाला आणखी स्वस्तामध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर सरकारने तुमच्यासाठी एक ऑफर आणली आहे. यासाठी तुम्ही 5 फेब्रुवारीपर्यंत केंद्र सरकारच्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या भारतीय बाजारात सोन्याचा भाव 50 हजार रुपयांहून खाली आला आहे. (gold investment plan sovereign gold bond scheme series xi in open for investor till 5th february)

चालू आर्थिक वर्षात सॉवरेन गोल्ड बॉन्डची 11वी सीरिज 1 फेब्रुवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुली असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, यावेळी गोल्ड सब्सक्रिप्शनची किंमत 4,912 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. याआधी जानेवारीमध्ये 10 व्या सीरिजमध्ये सोन्याची किंमत 5,104 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली होती. यावेळी किंमत आणखी कमी झाल्याने सोनं खरेदीची ही उत्तम संधी असणार आहे.

नेहमीप्रमाणे यावेळीही ऑनलाईन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना बॉन्डच्या निश्चित केलेल्या किंमतीवर प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. यामुळे डिजिटल सोनं खरेदी आणि गुंतवणूक करणाऱ्यांना एक ग्रॅम सोन्यासाठी 4862 रुपये मोजावे लागणार आहेत. खरंतर, या सरकारी गोल्‍ड बॉन्ड योजनेमध्ये सोन्याच्या किंमती बाजार भावापेक्षा कमी असतात. सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेमध्ये सोन्याची किंमत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ठरवली जाते. या अंतर्गत तुम्ही सोन्यामध्ये किमान एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलोपर्यंत गुंतवणूक करू शकता. सगळ्यात खास म्हणजे यामध्ये तुम्हाला ट्रॅक्सवरही सूट मिळते.

काय आहेत सॉवरेन गोल्ड बॉन्डचे फायदे

या बॉन्‍डवर वर्षाला कमीत कमी अडीच टक्के परतावा मिळतो. ग्राहकांच्या सगळ्यात हिताचा फायदा म्हणजे यामध्ये कुठलीही फसणूक किंवा खोटं सोनं असल्याची भीती नसते. हे बॉन्ड्स 8 वर्षांनंतर मॅच्यूअर होतात. म्हणजेच 8 वर्षानंतर तुम्ही गुंतवणुकीचे पैसे काढू शकता. इतकंच नाही तर 5 वर्षानंतरही तुम्ही गुंतवणुकीतून पैसे काढू शकता.

किती खरेदी करू शकता सोने ?

– या योजनेंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची खरेदी करू शकतात.

– ट्रस्ट आणि इतर अशा युनिट्स दर वर्षी 20 किलो सोन्याची खरेदी करू शकतात.

– बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून गोल्ड बाँडची विक्री होईल.

सॉवरेन गोल्ड बाँडची खास वैशिष्ट्ये

– भारत सरकारच्या वतीने आरबीआय सॉवरेन गोल्ड बाँड जारी करतं. बाँडमधील गुंतवणूकदार एका ग्रॅमच्या गुणामध्येही गुंतवणूक करू शकतात.

– यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी हा 8 वर्ष ठरवण्यात आला आहे. (gold investment plan sovereign gold bond scheme series xi in open for investor till 5th february)

संबंधित बातम्या – 

ICIC च्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मोठा धक्का, कोर्टाकडून पोस्टचा गैरवापर केल्याचं स्पष्ट

रेशनकार्ड धारकांना मोठा झटका, रॉकेलवरील सबसिडी बंद, 1 एप्रिलपासून नवा नियम

LIC कडे सध्या 30 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम; आपल्या जमा रकमेचे सरकार काय करते?

(gold investment plan sovereign gold bond scheme series xi in open for investor till 5th february)

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.