सोन्यातील गुंतवणुकीची उत्तम संधी, दर घसरल्याने मोठ्या फायद्याचे संकेत, आजचा दर किती?
सोने दरातील चढ उताराचा फायदा घेण्यासाठी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक (Gold investment) केली जाते. सध्या सोने गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे.
मुंबई : भारतीय गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी नेहमीच सोन्याकडे (Gold rate) आकर्षित होतात. सोने दरातील चढ उताराचा फायदा घेण्यासाठी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक (Gold investment) केली जाते. सध्या सोने गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे. कारण गेल्या वर्षी सोन्याचा जो दर होता, त्या सर्वोत्तम दरापेक्षा सोने तब्बल 10 हजारांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे घटत निघालेल्या सोनेदरात गुंतवणूक करुन चांगला नफा कमावण्याची संधी आहे. सोन्याचा आजचा तोळ्याचा भाव 48 हजार 275 प्रति तोळा इतका आहे. हाच दर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 56 हजारापर्यंत गेला होता. (Gold investment tips gold prices down today investor can get good returns )
येत्या काळात मागणी वाढल्यामुळे सोन्याचे दर पुन्हा चढू शकतात. त्यामुळे उतरलेल्या किमतीत सोने खरेदी करुन नंतर वाढलेल्या दरांनी विक्री करता येऊ शकते.
मागील वर्षी सोन्यातील गुंतवणुकीने 28 टक्के रिटर्न दिले होते. जर तुम्हाला दीर्घ मुदतीची गुंतवणूक करायची असेल तर सोने हा चांगला पर्याय आहे. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याने, त्यातून चांगला नफा मिळू शकतो. भारतात सोने केवळ एक महागडा धातू नाही तर शुभ ऐवज समजला जातो. जगात सोने खरेदीत भारताचा दुसरा नंबर लागतो.
48 हजारापासून किमती वाढणार?
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, “जुलैनंतर सोने महाग होण्याची शक्यता आहे. सध्याची सोने दरातील घसरण अस्थिर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरण्याची गरज नाही. जर सोन्याच्या किमती घसरत असतील तर खरेदीची चांगली संधी म्हणून गुंतवणूकदारांनी त्याकडे पाहावं. महिनाभरात सोन्याचा दर तोळ्यामागे 48,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतो”
आयात शुल्कात कपात
भारत सरकारने परदेशी बाजारातील घसरणीमुळे सोने-चांदीच्या आयात शुल्कात कपात केली आहे. सरकारी अधिसूचनेनुसार सोने-चांदीवर जवळपास 566 डॉलर प्रती 10 ग्रॅम (सोने) तर 836 डॉलर प्रती किलो (चांदी) आयात शुल्क आहे. 1 जुलै 2021 पासून ही अधिसूचना लागू करण्यात येत आहे.
(टीप : कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)
संबंधित बातम्या
‘या’ 8 बँकांमध्ये तुमचेही खाते आहे? आजपासून नवे बदल जाणून घ्या, अन्यथा पैसे जमा होण्यास अडथळे
Money: पोस्ट ऑफिसच्या 5 बचत योजनांमध्ये पैसे गुंतवा, कमी कालावधीमध्ये पैसे दुप्पट होणार