सरकारचा मोठा निर्णय; सराफ व्यापाऱ्यांना कर्जाची रक्कम सोनं देऊनही फेडता येणार

Gold | रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सोन्याची आयात करणाऱ्या अधिकृत बँका आणि गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम, 2015 मध्ये हिस्सेदारी असणारे अधिकृत बँक ज्वेलरी एक्स्पोटर्स आणि देशांतर्गत सोन्याच्या पेढ्यांना GML चा लाभ मिळू शकतो.

सरकारचा मोठा निर्णय; सराफ व्यापाऱ्यांना कर्जाची रक्कम सोनं देऊनही फेडता येणार
सोने तारण कर्ज
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 3:53 PM

मुंबई: केंद्र सरकारने देशातील सराफ व्यापारी आणि सोन्याची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सराफ आणि सोने व्यापाऱ्यांना पैसाऐवजी सोने (Gold) देऊन त्यांच्या गोल्ड (मेटल) लोनची (GML) परतफेड करता येणार आहे. मात्र, एका मर्यादेपर्यंत अशा स्वरुपात कर्ज फेडता येणार आहे. (Gold Monetisation Scheme jewellers can now repay part of gold loan in physical gold)

गोल्ड मेटल लोनची परतफेड ही सध्या पैशांच्या माध्यमातून केली जाते. मात्र, रिझर्व्ह बँकेने आता या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बँकांनी गोल्ड लोनचा काही हिस्सा म्हणजे एक किलो किंवा त्यापेक्षा अधिक कर्जाची परतफेड सोन्याच्या स्वरुपात करण्याची मुभा कर्जदारांना दिली पाहिजे. मात्र, त्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही अटी घालून दिल्या आहेत.

निर्णयाचा लाभ कोणाला मिळणार?

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सोन्याची आयात करणाऱ्या अधिकृत बँका आणि गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम, 2015 मध्ये हिस्सेदारी असणारे अधिकृत बँक ज्वेलरी एक्स्पोटर्स आणि देशांतर्गत सोन्याच्या पेढ्यांना GML चा लाभ मिळू शकतो.

स्थानिक पातळीवरील IGDS (India Good Delivery Standard)/ LGDS (LBMA’s Good Delivery Standards) सोन्याचा उपयोग करुन कर्जाची परतफेड होऊ शकते. कर्जदाराला परतफेडीसाठी देण्यात आलेला पर्याय, सोने कोणत्या स्वरुपात आणि त्यासाठी कोणत्या अटी असतील, या सगळ्याचा तपशील कर्जाच्या करारनाम्यात असला पाहिजे.

2015 मध्ये सुरु झाली होती Gold Monetisation Scheme स्कीम

Gold Monetisation Scheme ही 2015 साली सुरु झाली होती. गोल्ड (मेटल) लोनच्या पैशांचा वापर कोणत्या कारणांसाठी होतो यावर बँक देखरेख ठेवते. 2015 पासून घरगुती दागिने आणि संस्थानांकडे असलेले सोने तारण ठेवण्याच्या योजनेला प्रारंभ झाला होता.

संबंधित बातम्या:

PHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट

Gold Price : सोने-चांदीचे दर किती कमी होणार? इंधनाची किंमत किती वाढणार? वाजा तज्ज्ञांची मतं

Gold Price: सोन्याचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर, जाणून घ्या आजचा दर

(Gold Monetisation Scheme jewellers can now repay part of gold loan in physical gold)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.