Gold Price Today : ऐन लग्नसराईच्या तोंडावर पुन्हा स्वस्त झालं सोनं, इथे वाचा आजचे ताजे दर
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जारी करताना कस्टम ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला. याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Gold Price Today : बुधवारी सोन्याच्या भावांमध्ये तेजी आल्यानंतर आज पुन्हा एकदा भाव घसरल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi commodity exchnage) गुरुवारी फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा भाव 350 रुपयांनी घसरून 47,400 रुपयांवर ट्रेड करत आहेत. तर मार्चमधील चांदी 836.00 रुपयांनी घसरून 67,729.00 रुपयांवर व्यापार करत आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे. (gold price today fall down on 4 feburary here know the latest rates of gold in multi commodity exchange)
खरंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जारी करताना कस्टम ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे गुंतवणूकदार आताच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात आर्थिक बाजू ढासळली होती. पण आता सगळं काही पुर्वपदावर येत असल्यामुळे सोन्यामध्ये गुतंवणूकदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दिल्लीमध्ये काय आहे सोन्या-चांदीचा भाव (Gold- Silver Price Today in Delhi on 4th Feburary 2021)
– 22 कॅरेट सोन्याचा भाव – 46890 रुपये
– 24 कॅरेट सोन्याचा भाव – 51150 रुपये
– चांदीचा दर – 68500 रुपये
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय आहेत सोन्याचे भाव? आंतरराष्ट्रीय मार्केटविषयी बोलायचं झालं तर तिथेही आज सोन्याचे भाव घसरल्याचं दिसून आलं. अमेरिकेमध्ये सोनं 10.89 डॉलरच्या घसरणीसह 1,823.34 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे. तर चांदी 0.30 डॉलरच्या घसरणीसह 26.5 डॉलरवर बाजार करत आहे.
सोनं पुन्हा महागणार का?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोने-चांदीवरील पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली. मात्र, त्यांनी सोने-चांदीवर अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावणार असल्याचंदेखील सांगितलं. अर्थमंत्र्यांनी एकीकडे कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली तर दुसरीकडे सोन्यावर अडीच टक्क्याचा सेस लावणार असल्याचं सांगितलं.
‘अडीच टक्क्याचा निश्चितच फायदा’
‘सोन्यावर आधी साडेबारा टक्के कस्टम ड्युटी होती. ती आता साडेसात टक्क्यांपर्यंत आणली आहे. पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. पण दुसरीकडे सरकारने अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावलेला आहे. जी पूर्वी साडेबारा टक्के ड्युटी होती ती आता साडेसात अधिक अडीच म्हणजे दहा टक्के कर हा लागणारच आहे. त्यामुळे अडीच टक्क्याचा निश्चित फायदा हा सोनारांना होईल. किंवा सोनं स्वस्त होईल. आता तो फायदा सोनार ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे’, अशी भूमिका अर्थतज्ज्ञ निखिलेश सोमण यांनी मांडली.
“सोने खरेदीला भारतामध्ये वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारापर्यंत गेलं होतं. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंदेखील मत निखिलेश सोमण यांनी मांडलं. (gold price today fall down on 4 feburary here know the latest rates of gold in multi commodity exchange)
संबंधित बातम्या –
अमित शहांनी ‘या’ योजनेत गुंतवले 9 लाख, जबरदस्त आहे फायदा आणि व्याजदर
50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा सोनं, 5 फेब्रुवारीपर्यंत सरकारची खास योजना
बाजार भावापेक्षा 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे खास योजना
(gold price today fall down on 4 feburary here know the latest rates of gold in multi commodity exchange)