Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोन्या-चांदींच्या किंमतींमध्ये घसरण, पटापट वाचा ताजे दर

आज सलग 5व्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत, तर चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत.

Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोन्या-चांदींच्या किंमतींमध्ये घसरण, पटापट वाचा ताजे दर
सोने दर
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 12:46 PM

नवी दिल्ली : लग्नाच्या मोसमात सोन्याचे दर सातत्याने स्वस्त होत आहेत. आज सलग 5व्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत, तर चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. ज्यामुळे सोन्याचे दर एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. आज, एमसीएक्सवरील जूनचे सोन्याचे वायदे 0.3 टक्क्यांनी घसरले आणि ते प्रति 10 ग्रॅम 44,300 वर बंद झाले. खरंतर, गेल्या सात दिवसांत पाचव्या वेळी तो घसरला आहे. आता जर चांदीबद्दल बोलायचं झालं तर चांदी 0.8% घसरून 62,617 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. (gold prices silver prices down today gold silver price update check new rates)

सोन्याचे नवीन दर : दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,300 रुपयांवर पोहोचले. जी एका वर्षाची सर्वात खालची पातळी आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) स्पॉट सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1,683.56 डॉलर प्रति औंस झाले.

चांदीच्या नव्या किंमती : चांदीच्या किंमती बुधवारीही कमी झाल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारात चांदी 0.8% घसरून 62,617 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव आज औंस 24.01 डॉलरवर कायम आहे.

सोने का झाले स्वस्त?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमती खाली आल्यात. डॉलरच्या मजबुतीदरम्यान न्यूयॉर्कमधील सध्याच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये लोकांनी जोरदार विक्री केली. यासह सोने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

येत्या काही दिवसांत चांगला परतावा मिळेल

गुंतवणुकीसाठी सोने नेहमीच चांगला पर्याय ठरला आहे. असे सांगितले जात आहे की, पुन्हा सोन्याच्या किमती गुंतवणूकदारांना चांगले उत्पन्न देऊ शकतात. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या संशोधन अहवालानुसार, सध्या सोनं चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षीही सोन्याच्या किमतीनं उच्च विक्रम नोंदविला आहे. परंतु या क्षणी सोने ऑगस्टपासूनच्या विक्रमी उच्चांकडून सुमारे 11 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. 2021च्या शेवटी सोन्यामध्ये पुन्हा वाढ दिसून येईल. दीर्घ कालावधीत सोने नेहमीच चांगले उत्पन्न देते. (gold prices silver prices down today gold silver price update check new rates)

संबंधित बातम्या – 

PAN Aadhaar Linking Last Date : पॅन कार्डला आधारशी लिंक करण्याची आज शेवटची तारीख, पटापट करा अपडेट

Bank Holidays List : एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद, वाचा संपूर्ण लिस्ट

भविष्यासाठी PNB च्या खास योजनेत करा गुंतवणूक, जबरदस्त आहे फायदा

(gold prices silver prices down today gold silver price update check new rates)
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.