Gold Rate India Today : सोन्याचे भाव वाढले, चांदीही महाग; पटापट तपासा नवी किंमत

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते.

Gold Rate India Today : सोन्याचे भाव वाढले, चांदीही महाग; पटापट तपासा नवी किंमत
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 5:33 PM

नवी दिल्लीः Silver, Gold Price Today: राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सोन्याची किंमत 37 रुपयांनी वाढून 46,306 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील व्यापारात मौल्यवान धातू 46,269 रुपये प्रति पीसवर बंद झाली होती. चांदीची किंमतही 323 रुपयांनी वाढून 62,328 रुपये झाली. मागील व्यवहारात चांदीची किंमत 62,005 रुपये होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,766 डॉलर प्रति औंस होती. तसेच चांदीची किंमत 23.36 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, कॉमेक्स ट्रेडिंगमध्ये सोन्याच्या किमती स्पॉट किमतींसह व्यापार करत आहेत. सोमवारी ते किंचित घसरून 1,766 डॉलर प्रति औंस झाले. मजबूत डॉलर आणि संमिश्र जागतिक संकेतांमुळे सोन्याचे भाव वाढले.

सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाणार

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

भारतात गोल्ड एक्सचेंज उभारणार

बाजार नियामक सेबीने बुधवारी गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय व्यासपीठ असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.

संबंधित बातम्या

75 हजारांचा Samsung 5G स्मार्टफोन अवघ्या 38 हजारात, कुठे मिळतेय शानदार ऑफर?

SBI ची सेवा आता ‘या’ 15 भाषेत; कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान, अन्यथा मोठे नुकसान

Gold Rate India Today: Gold prices rise, silver also expensive; Quickly check the new price

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.