Gold Rate : सोनं वाढलं की दरात झाली घसरण? पाहा आठवड्याभराचे भाव

पूर्ण आठवड्याभरातही सोन्याचे भाव थोड्या फरकाने कमी-जास्त होत होते. जाणून घेऊयात काय होता आठवड्याभराचा भाव.

Gold Rate : सोनं वाढलं की दरात झाली घसरण? पाहा आठवड्याभराचे भाव
आतापर्यंत छोट्या शहरांमध्ये 60 टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी या अॅपच्या मदतीने सोनं खरेदी केली आहे.
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 8:45 AM

जळगाव : राज्यात कोरोनाच्या (Corona) या संकट काळात सोन्याच्या दरांमध्ये (Gold Rate) वारंवार घट झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत. आज जळगावात (Jalgaon) सोनं 51,763 प्रति तोळा तर चांदी 69,607 प्रति किलो आहे. अशात पूर्ण आठवड्याभरातही सोन्याचे भाव थोड्या फरकाने कमी-जास्त होत होते. जाणून घेऊयात काय होता आठवड्याभराचा भाव. (Gold Rate sliver rate rise or fall here know the weekly prices)

या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 14 डिसेंबरला भारतात सोने-चांदीचे भाव चांगलेच घसरले होते. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे भाव 460 रुपयांनी घसरले होते. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48 हजार 371 रुपयांवर पोहोचली होती. याआधी सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅम 48 हजार 831 रुपयांपर्यंत घसरला होता. सोनेपाठोपाठ चांदीचाही दर घसरल्याचं पाहायला मिळालं. 629 हा दर रुपयांनी घसरला होता. त्यामुळे सराफ बाजारात चांदीचा दर 62 हजार 469 प्रती किलोवर येवून पोहोचला होता तर त्याआधी हा दर 63 हजार 98 रुपये प्रती किलो इतका होता.

पुढच्या दिवशीही अशाच प्रकारे सोन्याचे भाव पहायला मिळाले. यानंतर बुधवारी म्हणजेच 16 डिसेंबरला पुन्हा सोने-चांदीला झळाळी आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सकाळी दहाच्या सुमारास सोने दरात 107 रुपयांची वाढ होऊन, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49550.00 रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीच्या दरात 324 रुपयांची (Gold silver rate today) वाढ पाहायला मिळाली होती. त्यामुळे चांदीचा प्रतितोळ्याचा भाव 65177 रुपयांवर पोहोचला होता.

जळगावातील सोन्याचा भाव (Jalgaon gold price today)

महाराष्ट्रातही गुंतवणूकदारांसह महिला वर्गाचं सोन्याच्या दरांकडे लक्ष लागलेलं असतं. महाराष्ट्रातील सोन्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात सोन्याचे भाव 50 हजार 600 प्रतितोळे इतका होता. तर जळगाव सराफ बाजारात चांदी 66 हजार 370 रुपये प्रतिकिलो असा भाव होता.

गुरुवारी म्हणजे 17 डिसेंबरला जळगावपेक्षा पुण्यात सोन्याचे दर अधिक असल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील सोन्याचा आददार दर प्रति तोळा 51 हजार 500 रुपये होता. तर जळगावात सोने प्रतितोळा 51 हजार 37 रुपये होता. कोल्हापूरचा विचार केला तर सोन्याचा भाव 51 हजार 100 रुपये प्रति तोळा इतका होता.

या दिवशी पुण्यापेक्षा जळगावात चांदी खरेदी करणं स्वत: ठरलं. कारण, पुण्यात चांदीची किंमत प्रति किलो 65 हजार रुपये इतकी होती. तर जळगावात चांदीला 67 हजार 506 रुपये प्रति किलो इतका दर होता. तिकडे कोल्हापुरात चांदी 64 हजार रुपये प्रति किलो दर होता.

गुरुवारी 18 डिसेंबरला मात्र सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील (maharashtra) वायदा बाजारात (commodity market – MCX) गुरुवारी सोने 50 हजारांच्या पार गेलं होतं, तर चांदीच्या किमतींनी 67 हजार 500 रुपयांचा टप्पा पार केला होता. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या किमतीत चढउतार होताना दिसत आहेत. अमेरिकेत मिळालेल्या मदतीच्या पॅकेजमुळे सोन्याच्या किमतीत उसळी आल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

चांदीची लखलख

गुरुवारी सकाळी वायदा बाजारात मार्च डिलीव्हरीची चांदी 759 रुपयांच्या वाढीसह प्रतिकिलो 66 हजार 670 रुपयांवर गेली होती. चांदीचा दर बुधवार अखेरीस 65 हजार 911 रुपये इतका होता. चांदीच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी उसळी पाहायला मिळाली होती. वायदे बाजारात हा भाव 67 हजार 500 रुपयांच्या वर गेला होता. (Gold Rate sliver rate rise or fall here know the weekly prices)

संबंधित बातम्या :

GOLD RATE | सोनं जळगावपेक्षा पुण्यात जवळपास साडे चारशे रुपयांनी महाग

Gold Price | सोनं महागलं! पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव…

(Gold Rate sliver rate rise or fall here know the weekly prices)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.