Gold Rate : 8 महिन्यात सगळ्यात स्वस्त झालं सोनं, यावर्षी 4000 ने घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

Gold Rate : गेल्या आठवड्यामध्ये सतत सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold rate) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. हे दर इतके घसरले आहेत की सोन्याच्या किंमती 8 महिन्यातील सगळ्यात जास्त घसरण (Gold rate 8 months low) आहे. या आठवड्यात MCX वर सोन्याचे दर दहा ग्रॅम 46126 रुपयांवर बंद झाले. ऑगस्ट 2020 मध्ये हा भाव 56200 च्या पातळीवर पोहोचला होता. […]

Gold Rate : 8 महिन्यात सगळ्यात स्वस्त झालं सोनं, यावर्षी 4000 ने घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 1:42 PM

Gold Rate : गेल्या आठवड्यामध्ये सतत सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold rate) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. हे दर इतके घसरले आहेत की सोन्याच्या किंमती 8 महिन्यातील सगळ्यात जास्त घसरण (Gold rate 8 months low) आहे. या आठवड्यात MCX वर सोन्याचे दर दहा ग्रॅम 46126 रुपयांवर बंद झाले. ऑगस्ट 2020 मध्ये हा भाव 56200 च्या पातळीवर पोहोचला होता. अशात सहा महिन्यांत 10 हजार रुपयांनी किंमत घसरली. म्हणजेच, गेल्या सहा महिन्यांत ही उच्च स्तरावरून 9 टक्क्यांनी आणि वार्षिक आधारावर 8 टक्क्यांनी (4000 रुपये) घसरली आहे. (Gold Rate today Gold price cheapest in 8 months falling by 4000 this year investors good news)

एप्रिल डिलीव्हरीठीच्या सोन्याचा भाव MCX वर प्रति दहा ग्रॅम 64 रुपयांनी वाढून 46190 रुपयांवर बंद झाला. जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 21 रुपयांनी वाढून 46,316 रुपये झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं या आठवड्यात उच्च पातळीवर बंद झालं. आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिलमध्ये सोन्याचा भाव 8.35 (+ 0.47%) वाढीसह प्रति औंस 1,783.35 डॉलरवर बंद झाला.

Silver Latest Price Today

MCX वर मार्च डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 420 रुपये तेजीसह 68914 रुपयांवर पोहोचला तर मे महिन्याच्या डिलिव्हरीच्या चांदीमध्ये 392 रुपयांची तेजी येत 70023 रुपए प्रति किलोग्रॅमवर पोहचला. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मार्च डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत 0.294 डॉलरने वाढून 27.37 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.

बजेटनंतर सोन्याच्या किंमतींवर परिणाम

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात (Gold Rate) चढउतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे, दुसरीकडे लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, गुंतवणूकदारही सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचे भावही मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही

सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (Gold Rate today Gold price cheapest in 8 months falling by 4000 this year investors good news)

संबंधित बातम्या – 

कर्मचाऱ्यांनो अजिबात हरवू नका ‘हा’ नंबर, अन्यथा तुमच्या कठीण काळात नाही मिळणार पैसे

LIC ची खास योजना, प्रत्येक महिन्याला मिळतील 16000; आताच करा गुंतवणूक

RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या ग्राहकांना आता काढता येणार फक्त 1 हजार

वयाच्या 30 व्या वर्षी व्हाल करोपडी, आता फक्त 30 रुपये गुंतवा आणि श्रीमंत व्हा!

(Gold Rate today Gold price cheapest in 8 months falling by 4000 this year investors good news)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.