सोन्याचा दर पुन्हा गगनाला भिडणार; वर्षाअखेरीस सोन्याचा प्रतितोळा भाव किती?

लॉकडाऊन संपल्यानंतर सोन्याची किंमत हळहळू कमी झाल्या होत्या. यंदाच्या वर्षात सोन्याची किंमत ही 50 हजारापर्यंत पोहोचली होती. (Gold-Silver Price Expected To Hit New High In 2021)

सोन्याचा दर पुन्हा गगनाला भिडणार; वर्षाअखेरीस सोन्याचा प्रतितोळा भाव किती?
gold
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 10:58 AM

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या टप्प्यापासून सोन्याच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षभरात कोरोना काळात सोन्याच्या किंमतींमध्ये नवीन विक्रम नोंदवला गेला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने उच्चांक गाठला होता. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर सोन्याची किंमत हळहळू कमी झाल्या होत्या. यंदाच्या वर्षात सोन्याची किंमत ही 50 हजारापर्यंत पोहोचली होती. (Gold-Silver Price Expected To Hit New High In 2021)

यंदाच्या एप्रिल महिन्यात सोनं हे 3 ते 4 हजार रुपयांनी महागलं आहे. त्यामुळे बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार 2021 च्या अखेरीस जागतिक स्तरावर सोन्याची किंमत ही प्रति औंस 2063 डॉलरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने (BoFA) दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात सोन्याच्या किंमत सातत्याने वाढत आहे. तसेच पुढेही सोन्याची दरवाढ कायम राहणार आहे. गेल्यावर्षी कोरोनामध्ये सोन्याची किंमत ही 3000 डॉलरने वाढू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अद्यापही BoFA चा हा अंदाज कायम आहे. तसेच बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या नव्या अहवालानुसार, येत्या वर्षभरात सोन्याचा दर हा 2063 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.

भारतात सोन्याच्या किंमतीचा अंदाज काय?

बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार, या वर्षाच्या अखेरीस जागतिक स्तरावर सोन्याचा दर हे प्रति औंस 2063 डॉलर इतका असू शकतो. एक औंस सोन्याचे वजन 28.34 ग्रॅम इतके असते. यानुसार एक ग्रॅम सोन्याची किंमत 5307 रुपये इतका असण्याची शक्यता आहे.

या अंदाजानुसार, सोन्याची किंमत लवकरच 53000 रुपयापर्यंत पोहोचू शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा जगातील मोठी बाजारपेठांना याचा फटका बसला आहे. ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.

भारतातील सोन्याचे नवे दर काय?

ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्रॅम ₹4,712 ₹5,127
8 ग्रॅम ₹37,696 ₹41,016
10 ग्रॅम ₹47,120 ₹51,270
100 ग्रॅम ₹4,71,200 ₹5,12,700

मे महिन्यात 10 महिन्यातील उच्चांकी दर

मार्च महिन्यापासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 31 मे रोजी सोन्याची किंमत ही 1907.59 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली होती. ही किंमत 10 महिन्यातील उच्चांकी दर होता. तर दुसरीकडे, जर एप्रिल महिन्याचा अंदाज लावायचा झाला तर भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतींमध्ये 3000 रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे येत्या काळात ही किंमत आणखी वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

(Gold-Silver Price Expected To Hit New High In 2021)

संबंधित बातम्या : 

Income Tax लाँच करणार नवीन पोर्टल, करदात्यांसाठी कोणती सुविधा?

Petrol Diesel Price | इंधन दरवाढीचा भडका, महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पार, नवे दर काय?

महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.