Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold rate Today : सोन्याचा दर 50 हजारांच्या खाली! काय आहे आजची किंमत? जाणून घ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्यासोबत युक्रेनच्या प्रश्‍नाबाबत शिखर परिषदेला तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर सोमवारी जागतिक बाजारात सोन्याच्या दरात बरीच घसरण झाली आहे.

Gold rate Today : सोन्याचा दर 50 हजारांच्या खाली! काय आहे आजची किंमत? जाणून घ्या
काय आहेत आजचे सोन्याचे दर?
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 1:52 PM

गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत होती. सुवर्ण बाजार तेजीत असल्याने अनेकांनी त्याच्यात गुंतवणूक करण्यावर भर दिला असताना सोमवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण (Gold rate fall) झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या- चांदीच्या दरात (Gold silver price) मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिल वायदा सोन्याचा भाव 0.46 टक्‍क्‍यांनी प्रति 10 ग्रॅमने घसरला, तर मार्च वायदा चांदीचा भाव 0.91 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्यासोबत युक्रेनच्या प्रश्‍नाबाबत झालेल्या शिखर परिषदेला तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर सोमवारी याचे पडसाद जागतिक बाजारावर पडल्याने सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे जाणकार सांगतात.

स्पॉटच्या किमती 0.2 टक्क्यांनी घसरून 1,893.80 डॉलर प्रति औंसवर आल्या, 1,908 डॉलर या आठ महिन्यांच्या उच्चांकावरून त्यांच्यात घसरण झालेली बघायला मिळत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस युक्रेन प्रश्‍नामुळे बाजारावर परिणाम जाणवून सोन्याच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

आजच्या (21 फेब्रुवारी 2022) सोने व चांदीच्या किंमती

सोमवारी एमसीएक्सवर एप्रिल वायदा सोन्याचा भाव 233 रुपयांनी घसरून 49,879 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, मार्च वायदा चांदीचा भाव 581 रुपयांनी घसरून 63,321 रुपये प्रतिकिलो झाला. इतर मौल्यवान धातूंमध्ये, स्पॉट सिल्व्हर 0.7 टक्के घसरून 23.79 डॉलर प्रति औंस, तर प्लॅटिनम 0.3 टक्के वाढून 1,070.29 डॉलरवर आला.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले,

कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत त्यामुळे महागाई वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात अल्पावधीत सोन्याचे 1950 डॉलरनंतर 2000 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल समूहाचे उपाध्यक्ष अमित सजेजा म्हणाले की,

गुंतवणूकदारांनी नफा मिळवला पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यासाठी 1865 डॉलरची पातळी महत्त्वाची आहे.

…तर सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत

महागाई नियंत्रणात येत नसल्याने सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये सुधारणा झाल्यामुळे पुढील तीन- चार महिन्यांत ते 2000 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. या दरम्यान एमसीएक्सवर सोने 52 हजारांपर्यंत जावू शकते.

दरम्यान, भारतातील पहिला सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड सुरू करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने गुंतवणूकदार चांदीमध्ये गुंतवणूक करू शकतात. आतापर्यंत सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होते. आता चांदीमध्येही गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक वाहने, सौर पॅनेल आणि वैद्यकीय उपकरणे बनवण्यासाठीही चांदीचा वापर केला जातो.

संबंधित बातम्या :

पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करताय? एसबीआयने दिला गंभीर इशारा…

12वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! मिळेल 81,000/- पर्यंत पगार, कसा करायचा अर्ज?

मार्च एंडिंगलाच बँकांना ‘हॉलिडे फिवर’… तब्बल इतक्या दिवस राहणार बंद, सुटयांची यादी पाहून नियोजन करा

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.