Gold Silver Price Today : सोने स्वस्त, चांदीचे भावही घसरले, वाचा ताजे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,802 डॉलर प्रति औंस होता आणि चांदीचा भाव 24.30 डॉलर प्रति औंस होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, मंगळवारी कॉमेक्स ट्रेडिंगवर स्पॉल गोल्डच्या किमती कमजोर झाल्याने सोन्याचे भाव 0.27 टक्क्यांनी घसरून USD 1,802 प्रति औंस झाले.

Gold Silver Price Today : सोने स्वस्त, चांदीचे भावही घसरले, वाचा ताजे दर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 5:45 PM

नवी दिल्लीः Gold Silver Rate Today : देशाची राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली. सोन्याचा भाव 5 रुपयांनी घसरून 47,153 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. HDFC सिक्युरिटीजच्या मते, हे कमकुवत जागतिक ट्रेंडमुळे झालेय. मागील व्यवहारात मौल्यवान धातू 47,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदी 287 रुपयांनी घसरून 64,453 रुपये प्रतिकिलो झाली. पूर्वीच्या व्यवहारात तो 64,740 रुपये प्रति किलो होता.

आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,802 डॉलर प्रति औंस होता आणि चांदीचा भाव 24.30 डॉलर प्रति औंस होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, मंगळवारी कॉमेक्स ट्रेडिंगवर स्पॉल गोल्डच्या किमती कमजोर झाल्याने सोन्याचे भाव 0.27 टक्क्यांनी घसरून USD 1,802 प्रति औंस झाले. ते पुढे म्हणाले की, मजबूत डॉलर आणि यूएस बाँड उत्पन्नात वाढीमुळे मंगळवारी सोन्याच्या किमती दबावाखाली राहिल्या.

सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाणार

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सध्या सुरू असलेल्या किमती 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. चांदीचा विचार केल्यास त्यातही मोठी वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत किंवा वर्षअखेरीस चांदीचे भाव 76,000 ते 82,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत जातील, असे बहुतांश व्यापाऱ्यांचे मत आहे.

भारतात उभारणार गोल्ड एक्सचेंज

बाजार नियामक सेबीने गोल्ड एक्सचेंज निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. गोल्ड एक्स्चेंजमध्ये सोन्याचे ट्रेडिंग इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट म्हणजेच EGR द्वारे केले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्स्चेंजमधून लॉन्च केले जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच ईजीआरची किमान किंमत किती असेल हे ठरवले जाईल. यानंतर स्टॉक एक्स्चेंज ईजीआरचे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या म्हणण्यानुसार, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR आणि फिझिकल सोन्याच्या वितरणासाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यापारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. गोल्ड एक्सचेंज हे ईजीआरच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय प्लॅटफॉर्म असेल. मानक सोन्याचा ईजीआर अंतर्गत व्यापार केला जाणार आहे आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.

संबंधित बातम्या

सॉवरेन गोल्ड बाँडची नवी योजना सुरू, सोने खरेदीसाठी याहून चांगला ‘मुहूर्त’ नाही, हे आहे कारण

LPG च्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक स्वयंपाक स्वस्त, ई-कूकिंग किती किफायतशीर?

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.