Gold Price Today: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोनं घसरलं, गतवर्षीच्या तुलनेत 9300 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

वरात्रीचा पवित्र उत्सव आजपासून सुरू झाला आहे. तुम्ही या सणासुदीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Gold Price Today: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोनं घसरलं, गतवर्षीच्या तुलनेत 9300 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 11:07 AM

Gold Price Today नवी दिल्ली: नवरात्रीचा पवित्र उत्सव आजपासून सुरू झाला आहे. तुम्ही या सणासुदीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचे भाव 82 रुपयांनी किंवा 0.17 टक्क्यांनी कमी झाले आहेत. आज सोने प्रति 10 ग्रॅम 46,825 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने 9,300 रुपयांनी स्वस्त आहे.

महागड्या चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर आज चांदीच्या किंमतीत 37 रुपयांची किंचित वाढ म्हणजे 0.06 टक्के नोंद झाली आहे. यासह चांदी 61,040 रुपयांना विकली जात आहे.

तुमच्या शहरातील सोने चांदी दर

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, भारतात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46,680 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. चांदीचा दर कालच्या व्यापार किमतीपेक्षा 100 रुपयांच्या वाढीसह 60,700 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. नवी दिल्ली आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम 45,750 रुपये आणि 45,680 रुपये इतके आहे.

मिस्ड कॉल देऊन दर मिळवा

तुम्हाला जर सोन्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही घरी बसून हे दर सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही लेटेस्ट दर पाहू शकता.

सोन्याची शुद्धता कशी तपासणार

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल , तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे, आपण सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.

सोने स्वस्त का होत आहे?

एचडीएफसी सिक्युरिटीज कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणतात की, जगातील अर्थव्यवस्था स्थिर प्रगती करीत आहेत. त्यामुळेच सामान्य माणसाचा कल आता शेअर बाजाराकडे वळलाय. त्यामुळेच सोन्याच्या किमतींवर दबाव कायम आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,750 रुपयांनी घट झाली. ज्वेलरी सोन्याची किंमत जानेवारीमध्ये 45,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, तर या महिन्यात त्याची किंमत 42,500 रुपयांपर्यंत खाली आली. किमती घसरल्याने मागणीला आधार मिळाला. याशिवाय मोठे सण पुढे आहेत, त्यामुळे ज्वेलर्सनी सोने खरेदी केले आहे.

इतर बातम्या:

Gold Silver Price Today: नवरात्रीपूर्वीच सोने खरेदीची संधी, एका दिवसात 200 रुपयांहून अधिक स्वस्त, पटापट तपासा

Gold Silver Price Today : सोने झाले महाग, चांदीचे दरही वाढले; पटापट तपासा

gold silver price today on 7 October 2021 Maharashtra Mumbai Delhi latest rate and updates on Navratri first day

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.