सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे भाव
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा सोने, चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात 0.17 टक्क्यांनी घसरण झाली असून, सोन्याचे दर प्रति तोळा 47,832 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरामध्ये देखील 0.14 टक्क्यांची घट झाली आहे.
नवी दिल्ली : Gold, Silver Price Today आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा सोने, चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात 0.17 टक्क्यांनी घसरण झाली असून, सोन्याचे दर प्रति तोळा 47,832 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरामध्ये देखील 0.14 टक्क्यांची घट झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 61,192 वर पोहोचले आहेत. सोने आणि चांदीच्या दरामध्ये अनुक्रमे 82 आणि 78 रुपयांची घट झाली आहे.
मौल्यवान धातुंच्या दरात अस्थिरता
दरम्यान आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी मौल्यवान धातुचे दर वधारले होते. मात्र त्यानंतर आज त्यामध्ये घट झाल्याची पहायला मिळत आहे. सोमवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर चांदीच्या दरात 0.27 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे सोने 48000 हजारांवर पोहोचले होते. आज त्यामध्ये घट होऊन, सोन्याचे दर 47,832 पर्यंत खाली आले आहेत.
क्रिप्टोमधील गुंतवणूक वाढली
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे सातत्याने बदलत आहेत. सोन्याचे दर कमी जास्त होत असल्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सोने प्रति ग्रॅम 56 हजारांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दराला घसरण लागली, या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात सोने 45 हजारांच्या देखील खाली आले होते. मात्र आता पुन्हा एकदा हळूहळू सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र सोन्याचे दर अस्थिर असल्याने अनेक गुंतवणुकदार सोन्यामधील आपली गुंतवणुक काढून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवताना दिसत आहेत.
संबंधित बातम्या
आता नोकरी सोडतानाही बसणार आर्थिक फटका; … तर तुमच्या वेतनावर लागणार जीएसटी
कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर
पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवा पैसे बँकेपेक्षा मिळेल अधिक परतावा