नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : जागतिक घडामोडी पूर्णपणे अनुकूल घडल्याने सोने-चांदीने मोठी उसळी घेतली. हे दोन्ही धातू सध्या सूसाट सुटले आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदीने चढाईही सुरुवात केली. त्यात खंड पडला नाही. सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी मात्र त्याला खंड पडला. गुडरिटर्न्सनुसार या दरवाढीला ब्रेक लागला. पण चढउताराचे सत्र सुरुच असते. ऑगस्ट महिन्यात मोठा खाडा पडल्यानंतर सोने-चांदीने दरवाढीचा बिगूल वाजवला. दोन्ही धातूंनी जोरदार उसळी घेतल्याने दोन आठवड्यात गुंतवणूकदारांना आणि खरेदीदारांना मोठा फायदा झाला. आता सप्टेंबर महिन्यात सोने-चांदीत (Gold-Silver Price Today 2 September 2023) किती वाढ होते, ते समोर येईल. दोन्ही धातूंना फेब्रुवारी आणि एप्रिलसारखा अजूनही रेकॉर्ड करता आलेला नाही. तो रेकॉर्ड सप्टेंबर महिन्यात मोडेल का, हे समोर येईल.
800 रुपयांची वाढ
गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीला मध्यंतरी बळ मिळाले नाही. भावात वाढ झाली नाही.
21 ऑगस्ट रोजी सोने 50 रुपयांनी वाढले. 23, 24 ऑगस्ट रोजी किंमती अनुक्रमे 180, 200 रुपयांनी वाढल्या. 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 30 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची वाढ झाली. 31 ऑगस्ट रोजी 160 रुपयांनी किंमती वधारल्या. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात 110 रुपयांची वाढ झाली. या दिवसात एकूण 860 रुपयांची वाढ झाली. या 22 कॅरेट सोने 55,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.
चांदी पण वधारली
ब्रेकनंतर चांदीने चांगलीच चढाई केली. 16 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. 18 ऑगस्टला 1000 रुपयांनी किंमती वाढल्या. 19, 21 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांचा चढ-उतार दिसून आला. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांनी किंमती वाढल्या. 23 ऑगस्ट रोजी 500, 24 ऑगस्ट रोजी 1600, 26 ऑगस्टला 500, 29 ऑगस्टला 200 आणि 30 ऑगस्ट रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. 1 सप्टेंबर रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 59,485 रुपये, 23 कॅरेट 59,247 रुपये, 22 कॅरेट सोने 54,488 रुपये, 18 कॅरेट 44614 रुपये, 14 कॅरेट सोने 34,799 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 74,645रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.