Gold Silver Rate Today : सोनं पुन्हा एकदा महागलं, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी कॉमेक्स ट्रेडिंगवर सोन्याच्या किमती $1,846 वर स्थिर होत्या. ते पुढे म्हणाले की, सोन्याच्या किमती अलीकडच्या तेजीच्या दबावाखाली घसरत आहेत. यामागील कारण मजबूत डॉलर आणि यूएस बॉण्ड उत्पन्नात वाढ आहे.

Gold Silver Rate Today : सोनं पुन्हा एकदा महागलं, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 6:59 PM

नवी दिल्लीः Gold Silver Price: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव 17 रुपयांनी वाढून 47,869 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, रुपयाची घसरण हे त्याचे कारण आहे. मागील व्यवहारात मौल्यवान धातू 47,852 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीचा भाव 444 रुपयांनी वाढून 64,690 रुपये प्रति किलो झाला. आधीच्या व्यवहारात तो 64,246 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे 1,846 डॉलर प्रति औंस आणि 24.85 डॉलर प्रति औंस होते.

सोन्याच्या किमती अलीकडच्या तेजीच्या दबावाखाली घसरत

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी कॉमेक्स ट्रेडिंगवर सोन्याच्या किमती $1,846 वर स्थिर होत्या. ते पुढे म्हणाले की, सोन्याच्या किमती अलीकडच्या तेजीच्या दबावाखाली घसरत आहेत. यामागील कारण मजबूत डॉलर आणि यूएस बॉण्ड उत्पन्नात वाढ आहे.

फ्युचर्स ट्रेडमधील किमती

वायदा व्यवहारात सोमवारी सोन्याचा भाव 19 रुपयांनी वाढून 48,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीसाठीचे करार 19 रुपये किंवा 0.04 टक्क्यांनी वाढून 48,847 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. हे 5,440 लॉटच्या व्यवसायाच्या उलाढालीसाठी आहे. दुसरीकडे वायदा व्यवहारात चांदीचा भाव 440 रुपयांनी वाढून 65,996 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 440 रुपये किंवा 0.67 टक्क्यांनी वाढून 65,996 रुपये प्रति किलो झाला.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सोमवारी 10 पैशांनी घसरून 74.40 वर बंद झाला. आंतरबँक परकीय चलन बाजारात स्थानिक चलन 74.36 वर कमजोरीसह उघडले आणि त्यात आणखी घसरण दिसून आली. 74.30 च्या आधीच्या बंदच्या तुलनेत 12 पैशांनी घसरून रुपया अखेर 74.42 प्रति डॉलरवर बंद झाला. गुरुनानक जयंतीनिमित्त शुक्रवारी विदेशी चलन बाजार बंद होते.

BSE सेन्सेक्स 1,170.12 अंकांनी किंवा 1.96 टक्क्यांनी घसरून 58,465.89 वर होता

देशांतर्गत शेअर बाजाराच्या आघाडीवर BSE सेन्सेक्स 1,170.12 अंकांनी किंवा 1.96 टक्क्यांनी घसरून 58,465.89 वर होता. तर NSE निफ्टी 348.25 अंकांनी किंवा 1.96 टक्क्यांनी घसरून 17,416.55 वर बंद झाला. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या ताज्या अहवालानुसार, भारतातील सोन्याची मागणी कोविडपूर्वीच्या पातळीवर परत आलीय आणि यापुढेही तेजी राहण्याची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

आता आधारशी संबंधित काम झाले सोपे, UIDAI कडून ही सेवा सुरू

कर्मचाऱ्यांनो! घरी बसून नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करा, स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.