खूशखबर! सरकार मोफत गॅस कनेक्शन देणार, कोणत्याही पत्त्यावर घेता येणार, नियम काय?
जर तुम्हाला देखील या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आता तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत आता ते लोक एलपीजी कनेक्शन घेऊ शकतील, ज्यांचा कायमचा पत्ता नाही.
नवी दिल्ली : जर तुम्हाला मोफत एलपीजी कनेक्शन (LPG Connection) मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लवकरच उज्ज्वला योजनेचा (Ujjwala Yojana) दुसरा टप्पा लागू करणार आहे. सरकारी तेल कंपन्या आता उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम मसुदा तयार करीत आहेत. जर तुम्हाला देखील या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आता तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत आता ते लोक एलपीजी कनेक्शन घेऊ शकतील, ज्यांचा कायमचा पत्ता नाही.
या योजनेचा लाभ शहरांमध्ये राहणाऱ्या गरिबांना दिला जाणार
या योजनेचा लाभ शहरांमध्ये राहणाऱ्या गरिबांना दिला जाईल. यासह जे देशाच्या विविध भागांमध्ये नोकरीमुळे जागा बदलतात, त्यांनाही या योजनेचा लाभ होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM nirmala sitharaman) यांनी या योजनेंतर्गत 1 कोटी गॅस कनेक्शन देण्याची घोषणा आधीच केली आहे.
2016 पासून योजना अस्तित्वात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. धुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने महिलांसाठी मोफत गॅस सिलिंडर कनेक्शन देण्याची योजना आखली होती. या योजनेंतर्गत तुम्ही घरी बसून मोफत एलपीजी सिलिंडर कनेक्शनसाठी अर्ज करू शकता. अर्जदार महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच त्यांचे बँक खाते आणि बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा
>> तुम्हाला आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. >> pmujjwalayojana.com वर क्लिक करा. >> होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जा आणि त्यावर क्लिक करा. >> डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल. >> आता फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा. >> आता OTP जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा. >> त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा. >> फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीला सबमिट करा
आता तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जवळच्या एलपीजी एजन्सीकडे जमा करावा लागेल. यासह आपल्याला आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचा पुरावा, बीपीएल रेशन कार्ड आणि फोटो इत्यादी कागदपत्रे द्यावी लागतील. कागदपत्र पडताळल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.
संबंधित बातम्या
LIC ची जबरदस्त योजना, एकदाच पैसे भरा आणि 14 लाख मिळवा
शेअर बाजारात येतोय आदित्य बिर्ला सनलाईफचा IPO, गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी
Good news! The government will provide free gas connection, can be taken at any address, what are the rules?