210 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 60 हजार, कोरोना काळात 15 लाख लोकांनी सुरू केली ‘ही’ सरकारी योजना

देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) अवघ्या 9 महिन्यांमध्ये या सरकारी योजनेशी तब्बल 15 लाखांहून अधिक लोक जोडले गेले आहेत.

210 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 60 हजार, कोरोना काळात 15 लाख लोकांनी सुरू केली 'ही' सरकारी योजना
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 4:22 PM

नवी दिल्ली : कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गासाठी सुरू केलेली अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) कोरोनाच्या कठीण काळात अनेकांच्य पसंतीस पडली. कारण गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) अवघ्या 9 महिन्यांमध्ये या सरकारी योजनेशी तब्बल 15 लाखांहून अधिक लोक जोडले गेले आहेत. (government pension scheme atal pension yojana 15 lakh new subscribers enrolled via sbi in 9 months)

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (PFRDA) जारी केलेल्या आकड्यांनुसार, 31 डिसेंबर 2020 पर्यंत 52 लाखांहून जास्त नवे सब्सक्रायबरर्स या योजनेशी जोडले गेले आहेत. इतकंच नाही तर 2.75 कोटी इतके अटल पेन्शन योजनेचे एकूण सब्सक्रायबरर्स आहेत.

खरंतर, मोदी सरकारने 2015 मध्ये अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली होती. यामध्ये 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक भाग घेऊ शकतो. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार 1,000 ते 5,000 महिन्याची पेन्शन गॅरंटी देत आहे.

असं उघडा अटल पेन्शन योजनेत खातं

कुठल्याही बँकेच्या शाखेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी बचत खातं उघडून शकता. यानंतर बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने एपीवाय नोंदणीकरण फॉर्म भरा. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि आधार नंबर देणं महत्त्वाचं आहे. खरंतर, योजनेसंबंधी आणि बचत खात्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हे गरजेचं आहे.

42 रुपयांपासून सुरू होते गुंतवणूक

अटल पेन्शन योजनेअंतर्गत 60 वर्षानंतर 1,000 रुपये मासिक पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला प्रतिमहिना 42 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्हाला महिन्याला 5000 रुपये पेन्शन हवं असेल तर यासाठी तुम्ही 60 वयापर्यंत 210 रुपये जमा करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये 40 वयापर्यंत योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि 1000 रुपेय महिन्याला पेन्शन हवं असेल तर यासाठी तुम्हाला दरमहा 291 रुपये आणि 5000 पेन्शनसाठी दरमहा 1,454 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. (government pension scheme atal pension yojana 15 lakh new subscribers enrolled via sbi in 9 months)

संबंधित बातम्या – 

Loan Process | कर्ज घ्यायचा विचार करताय? मग ‘या’ 3 गोष्टींकडे लक्ष द्या…

नव्या वर्षात स्वस्तात खरेदी करा स्वप्नातलं घर, PNB तब्बल 3100 घरांचा करतेय लिलाव

(टीप – कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्याआधी एकदा गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

(government pension scheme atal pension yojana 15 lakh new subscribers enrolled via sbi in 9 months)

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.