नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या जीवघेण्या काळात देशात बँकिंग फसवणूकीचे धक्कादायक प्रकार सातत्याने वाढत आहेत. यासाठी इंटरनेट आणि व्हॉट्सअॅपचा वाढता वापर हे मोठं कारण आहे. खरंतर, कोरोनामुळे, मोठ्या संख्येने लोक घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापरही वाढला आहे. हल्ली ऑफिसची सगळी कामं व्हॉट्सअॅपवर होतात. पण याचाच गैरफायदा सायबर गुन्हे वाढले आहेत. (government warns people to not click fraud link in whatsapp message)
आताही व्हॉट्सअॅपवर असाच एक फसवणूक करणारा मेसेज फिरत आहे. ज्यामध्ये कोरोनाच्या संकटात फंड मिळवण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला असाच एखादा मेसेज आला तर सावधगिरी बाळगा. कारण, तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमची सर्व माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याशी शक्यता आहे. या माहितीचा कुठल्याही कामासाठी गैरवापर केला जाऊ शकतो.
या सायबर गुन्ह्यांसंबंधी सरकारने नागरिकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपचा वापर करून फसवणूक करत असल्याचं सरकारने म्हटलं आहे. यामध्ये सरकारकडून कोरोना साथीच्या रोगासाठी मदत निधी मिळत असल्याचं सांगत फसवणूक होत आहे. पण हे खोटं असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
Claim: A message circulating on #WhatsApp claims that the Government has ordered payment of ₹130,000 as #Covid funding to all citizens above the age of 18.#PIBFactCheck: The claim is #Fake. No such announcement has been made by the Government. pic.twitter.com/NF8dH08wLW
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 24, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, या मेसेजमध्ये वापरकर्त्यांना दिलेल्या लिंकवर क्लिक करून आवश्यक तपशील भरायला सांगितला जातो. तुम्ही तुमची माहिती भरताच मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे खासगी माहिती विचारणारा कोणताही मेसेज आला तर सावधान राहा असं सराकरकडून सांगण्यात येत आहे. (government warns people to not click fraud link in whatsapp message)
इतर बातम्या –
Fact Check : खरंच मोदी सरकार कोरोना फंडिंगने प्रत्येकाला 1 लाख 30 हजार रुपये देणार का?
अलर्ट! 1 डिसेंबरपासून बदलणार हे नियम, सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल कात्री
आधार कार्डधारकांसाठी अलर्ट! UIDAI चा सतर्कतेचा इशारा, अन्यथा मोठं नुकसान…#aadharcard #UIDAI https://t.co/g6LVZilkY3
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
(government warns people to not click fraud link in whatsapp message)