AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेंबे थेंबे तळे साचेलच, आज करा ‘इतकी’ गुंतवणूक, महिन्याला दीड लाख तुमचेच!

गेल्या काही वर्षांत स्थिर ठेवी, सार्वजनिक भविष्य निधी, आवर्ती ठेवी यासारख्या कर्जाच्या साधनांवरील व्याज दर सातत्याने कमी होत आहे.

थेंबे थेंबे तळे साचेलच, आज करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला दीड लाख तुमचेच!
शेअर मार्केट
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 12:49 PM
Share

Mutual fund Investments मुंबई : प्रत्येकजण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत असतात. गेल्या काही वर्षांत स्थिर ठेवी, सार्वजनिक भविष्य निधी, आवर्ती ठेवी यासारख्या कर्जाच्या साधनांवरील व्याज दर सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार स्वत: साठी गुंतवणूकीचे अधिक चांगले पर्याय शोधत असतात. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. पण यात गुंतवणूक करणे हे जोखीमयुक्तही असते. मात्र जर तुम्ही यात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली जर त्या जोखीमेत लक्षणीय घट होते.

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूक करताना प्रत्येकवेळी महागाईचा वाढता दर लक्षात ठेवणे गरजेचे असते. जर तुम्ही पुढील 20 वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल तर सरासरी 10-12 टक्के ROI (गुंतवणूक परतावा) सहज मिळतो. मात्र या परताव्याचा महागाईवर तितका परिणाम होत नाही. म्हणजेच समजा सध्या A चा मासिक खर्च 40 हजार रुपये आहे. जर पुढील 20 वर्षानंतर सरासरी 6 ते 7 टक्के महागाई दराच्या आधारे ही रक्कम वाढून 1.25-1.5 इतकी होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत A ला 20 वर्षानंतर निवृत्त होईपर्यंत इतकी गुंतवणूक करावी लागेल, ज्यानुसार त्याला दर महिना दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल.

भविष्यात महागाईचा दर काय?

ET Money Inflation Calculator च्या म्हणण्यानुसार, जर सध्या A चा मासिक खर्च 40 हजार रुपये असेल तर 20 वर्षानंतर सरासरी 7 टक्के महागाई दराने A ला 1.55 लाख रुपयांची गरज आहे. तसेच सरासरी 6 टक्के महागाई दराने ही रक्कम 1.28 लाख रुपये इतकी असेल. तर सरासरी 8 टक्के महागाई दर ही रक्कम 1.86 लाख रुपये इतकी असेल.

किती परतावा मिळणार?

SBI Mutual Fund Calculator च्या मते, जर तुम्ही यात 50 लाख रुपये एकरकमी जमा केले तर 20 वर्षानंतर 10 टक्के परतव्यानुसार तुमच्याकडे 3.36 कोटी रुपये जमा होतील. तर 11 टक्क्यांच्या सरासरी परताव्यानुसार 4 कोटी आणि 12 टक्के परताव्यावर 4.82 कोटी रुपये होतील.

सरासरी 4 टक्के रक्कम काढल्यास 1.5 लाख रुपये मिळणार

ही गुंतवणूक मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला दरवर्षी 4 टक्के रक्कम काढता येते. ही रक्कम सरासरी 1.2 लाख ते 1.7 लाखाच्या तुलनेत असते. जर तुम्हाला 20 वर्षानंतर दरमहा 1.5 लाख रुपये उत्पन्न हवे असेल तर सध्या महागाईदरानुसार 40 हजार रुपयांचे मूल्य हे 1.5 लाखांच्या जवळ जाईल. त्यासाठी तुम्हाला एकरकमी 50 लाख रुपये जमा करावे लागतील. या गुंतवणूकीतून येणारा सरासरी परतावा हा 10-12 टक्के असावा लागतो.

(How much invest for get 1.5 lakh monthly income after 20 years)

संबंधित बातम्या :

SBI कडून ग्राहकांसाठी नोटीस जारी, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर करा ‘हे’ काम

तुमच्या गाडीत 100% शुद्ध पेट्रोल टाकलं जात नाही, ‘या’ गोष्टीची भेसळ! नेमकं नुकसान काय?

ATM मधून रंग लागलेली नोट बाहेर आली तर काय करावे? नियम काय सांगतो?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.