IDBI Bank strategic sale: विक्री व्यवस्थापनाच्या शर्यतीत सात कंपन्या, 10 ऑगस्टला होणार निर्णय

या कंपन्या 10 ऑगस्ट रोजी सार्वजनिक मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागासमोर (DIPAM) व्हर्च्युअल सादरीकरण करतील. ही माहिती दीपमने जारी केलेल्या नोटीसमधून प्राप्त झालीय.

IDBI Bank strategic sale: विक्री व्यवस्थापनाच्या शर्यतीत सात कंपन्या, 10 ऑगस्टला होणार निर्णय
आयडीबीआय बँक
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 1:40 PM

नवी दिल्लीः आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीचे व्यवस्थापन (IDBI Bank strategic disinvestment) करण्याच्या शर्यतीत जेएम फायनान्शिअल, अर्न्स्ट अँड यंग (E&Y) आणि डेलॉइटसह सात कंपन्या उतरल्यात. या कंपन्या 10 ऑगस्ट रोजी सार्वजनिक मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागासमोर (DIPAM) व्हर्च्युअल सादरीकरण करतील. ही माहिती दीपमने जारी केलेल्या नोटीसमधून प्राप्त झालीय.

बँकेत सरकारचा हिस्सा 45.48 टक्के

आयडीबीआय बँकेच्या स्ट्रॅटेजी सेल्समध्ये व्यवहार सल्लागाराच्या भूमिकेसाठी डेलॉईट टच तोहमात्सु इंडियन एलएलपी, अर्न्स्ट अँड यंग एलएलपी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, जेएम फायनान्शियल लिमिटेड, केपीएमजी, आरबीएसए कॅपिटल अॅडव्हायझर्स एलएलपी आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्सने बोली लावली. सध्या आयडीबीआय बँकेत एलआयसीचे व्यवस्थापकीय नियंत्रण 49.24 टक्के आहे. बँकेत सरकारचा हिस्सा 45.48 टक्के आहे. गैर-प्रवर्तक भागधारक 5.29 टक्के आहेत.

किती भागविक्री केली जाणार?

बँकेत निर्गुंतवणूक करायची रक्कम नंतर जाहीर केली जाणार आहे. आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने या वर्षी जूनमध्ये नामांकित व्यावसायिक सल्लागार कंपन्या/ गुंतवणूक बँकर्स/ मर्चंट बँकर्स/ वित्तीय संस्था/ बँका इत्यादींकडून बोली मागवल्या होत्या. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 13 जुलै होती, ती वाढवून 22 जुलै करण्यात आली.

मे 2021 मध्ये निर्गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली

केंद्रीय मंत्रिमंडळाने मे 2021 मध्ये आयडीबीआय बँकेत धोरणात्मक निर्गुंतवणुकीला मंजुरी दिली होती. यामध्ये सरकार आपला संपूर्ण हिस्सा विकेल. तसेच एलआयसीचा हिस्साही विकला जाईल. त्यात किती भागभांडवल विकले जाईल, याचा निर्णय आरएफपीच्या आधी घेतला जाईल.

आतापर्यंत सरकारला निर्गुंतवणुकीतून 7648 कोटी मिळाले

1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीसाठी 1.75 लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. यापैकी 1 लाख कोटी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांमधील सरकारी हिस्सा विकून उभारले जातील. त्याच वेळी सीपीएसईच्या निर्गुंतवणुकीद्वारे 75 हजार कोटी उभारले जातील. चालू आर्थिक वर्षात (2021-22) आतापर्यंत निर्गुंतवणुकीद्वारे सरकारला 7648 कोटी रुपये मिळाले आहेत.

संबंधित बातम्या

Paytm वरून गॅस सिलिंडर करा बुक आणि 2700 रुपये कॅशबॅक मिळवा, ऑफर किती दिवस?

तुम्ही पीएफमधून पैसे काढताय; मग लवकर करा हे काम अन्यथा पैसे अडकणार

IDBI Bank strategic sale: Seven companies in sales management race, decision to be taken on August 10

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.