Raj Subramaniam : आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी राज सुब्रम्हण्यम 6 लाख कर्मचाऱ्यांचं नेतृत्त्व करणार, जगप्रसिद्ध फेडेक्स कंपनीच्या सीईओपदी निवड

अमेरिकेतील बहूराष्ट्रीय (America) कुरिअर कंपनी फेडेक्सच्या सीईओपदी भारतीय वंशाचे राज सुब्रम्हण्यम (Raj Subramaniam ) यांची निवड झाली आहे.

Raj Subramaniam : आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी राज सुब्रम्हण्यम 6 लाख कर्मचाऱ्यांचं नेतृत्त्व करणार, जगप्रसिद्ध फेडेक्स कंपनीच्या सीईओपदी निवड
राज सुब्रम्हण्यम Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 9:03 PM

नवी दिल्ली : अमेरिकेतील बहूराष्ट्रीय (America) कुरिअर कंपनी फेडेक्सच्या सीईओपदी भारतीय वंशाचे राज सुब्रम्हण्यम (Raj Subramaniam ) यांची निवड झाली आहे. राज सुब्रम्हण्यम हे फ्रेडरिक वी स्मिथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील, 1 जून 2022 पासून ते सीईओ पदाचा रारभार स्वीकारतील. 20202 मध्ये राज सुब्रम्हण्यम फेडेक्सच्या (Fedex) संचालक मंडळात दाखल झाले होते. राज सुब्रम्हण्यम सध्या फेडेक्स एक्स्प्रेसचे सीईओ म्हणून काम करत आहेत. फेडेक्स एक्स्प्रेस ही जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी आहे. सुब्रम्हण्यम यांनी फेडेक्स कंपनीचे चीफ मार्केटिंग अँड कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून देखील काम केलं आहे. कॉर्पोरेट रणनीती ठरवण्याचं काम राज सुब्रम्हण्यम यांनी केलं आहे.

ट्विट

राज सुब्रम्हण्यम यांचं सध्याचं वय 56 वर्ष आहे. ते कॅनडामधील फेडेक्स एक्स्प्रेसचे अध्यक्ष आहेत. फेडेक्सला 1991 जॉईन झाल्यानंतर राज सुब्रम्हण्यम यांनी फेडेक्स कंपनीत वेगेवळ्या पदावर काम केलं आहे. फेडेक्सच्या मार्केटिंग आणि व्यवस्थापनात त्यांनी काम केलं आहे. फेडेक्स एक्स्प्रेस कंपनीत विविध पदावंर काम केल्यानंतर राज सुब्रम्हण्यम याची 2019 मध्ये फेडेक्स एक्स्प्रेसच्या सीओओ पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण

राज सुब्रम्हण्यम हे मूळचे केरळच्या थिरुवनंतपुरमचे आहेत. सध्या ते अमेरिकेतील टेनान्स प्रांतातील मेम्फिस मध्ये वास्तव्यास आहेत. आयआयटी मुंबईमध्ये त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. तर, पदव्युत्तर पदवी देखील केमिकल इंजिनिअरिंगमध्ये घेतली आहे. टेक्सास विद्यापीठातून राज सुब्रम्हण्यम यांनी एमबीए पूर्ण केलं आहे. राज सुब्रम्हण्यम गेल्या 30 वर्षांपासून फेडेक्स कंपनीमध्ये कार्यरत आहेत. सुब्रम्हण्यम यांच्याकडे जागतिक पातळीवरील धोरण निश्चिती आणि कंपनीची रणनीती ठरवण्याचा अनुभव आहे.

फेडेक्स कंपनीचे डेविड स्टेनर यांनी राज सुब्रम्हण्यम हे कंपनीला मोठ्या उंचीवर घेऊन जातील असं म्हटलं आहे. फेडेक्स कंपनीचे जगभऱात 6 लाख कर्मचारी आहेत.

इतर बातम्या:

Nashik petrol pump : नाशिकमध्ये गुढी पाडव्यादिवशी पेट्रोल पंप राहणार बंद, आयुक्तांच्या निर्णयाविरोधात पेट्रोल विक्रेते आक्रमक

Video : पूर्व दिल्ली महापालिकेत लाथा-बुक्क्यांचा प्रसाद आणि शिव्यांची लाखोली! AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.