सोन्याच्या दराचा शत्रू कोण? का घसरतोय सातत्यानं भाव?

सोन्याचे भाव कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे क्रिप्टोकरंसी आहे.

सोन्याच्या दराचा शत्रू कोण? का घसरतोय सातत्यानं भाव?
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 2:01 PM

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत घसरण झाल्याचं समोर आलं आहे. शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे. पण अमेरिकन बँक जेपी मार्गेन यांच्या अहवालानुसार, सोन्याचे भाव कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे क्रिप्टोकरंसी आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरंसी बिटकॉइनची लोकप्रियता वाढत चालली आहे. (important reasons why gold price reduced continuously)

ऑक्टोबरपासून आतापर्यंत यामध्ये तब्बल 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. इतकंच नाही तर सोन्यात सातत्याने घट होत आहे. कोरोनाच्या जीवघेण्या संकटातही सोन्याची किंमत ऑगस्टमध्ये 55 हजारांच्या जवळ पोहोचली होती. ती आता 50 हजाराच्या खाली गेली आहे. त्यामुळं आता बिटकॉइन हे भारतातील सोन्याच्या जागी उत्तम जागा बनवत चालला आहे.

अमेरिकन बँक जेपी मार्गन यांनी एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, बिटकॉइनसह डिजिटल चलनाचीदेखील लोकप्रियता वाढत चालली आहे. यामुळे सोन्यामध्ये सध्या घट होत असल्याचं दिसून येतं. खरंतर, शतकानुशतके लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला पसंती देतात. जेव्हा-जेव्हा मंदीचा काळ आला असेल तेव्हा लोकांनी या गुंतवणूकीतून पैसे कमावला. जेव्हा इक्विटी मार्केट चढतं तेव्हा सोन्याच्या किंमती घसरतात. पण सोन्याच्या खाली येण्याचं कारण हे फक्त इक्विटी बाजाराची वाढच नाही तर त्यासाठी बिटकाइनदेखील कारणीभूत आहे.

बिटकॉइनमध्ये वाढली गुंतवणूक

गेल्या ऑक्टोबरपासून डिजिटल चलनात खासकरून बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबरच्या मध्यामध्ये, बिटकॉइनची किंमत 19462 डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. ऑक्टोबरपासून त्यामध्ये फक्त 2 अब्ज डॉलर्सचीच गुंतवणूक झाली आहे. जगभरात बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याची क्रेझ वाढत आहे. कारण, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो. इतकंच नाही तर मालमत्ता वर्गातदेखील त्याची लोकप्रियता वाढवत असल्याने त्यात गुंतवणूक वाढत आहे.

सोन्याच्या अडचणी वाढतील गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. ऑगस्टपासून सोन्याच्या दरात दहा ग्रॅमने पाच हजार रुपयांपेक्षा कमी घट झाल्याचं पाहायला मिळालं. खरंतर, कोरोना लसीची बातमी आल्यापासून गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीपासून दूर होताना दिसत आहेत. कारण, सोन्याची घसरण अशीच सुरू राहिल असं तज्ज्ञांचं मत आहे.

काय आहे तज्ज्ञांचं मत ?

केडिया अ‍ॅडव्हायझरीचे एमडी अजय केडिया यांनी टीव्ही 9 भारतवर्षाला दिलेल्या मागहितीनुसार, इक्विटीमध्ये वाढ आणि सोन्याच्या उच्च मूल्यामुळे गुंतवणूकदार पर्यायी गुंतवणूकीचा शोध घेत आहेत. बिटकॉइनमध्ये येणारी तेजी हे त्याचं मुख्य कारण आहे. बिटकॉइनने डिसेंबर 2017 चे उच्च लेबलही ओलांडले आहे. डिसेंबर 2017 मध्ये, बिटकॉइनने 19818 डॉलरची उच्चांकी रक्कम गाठली होती. ती आता 19900 डॉलरच्याही पुढे गेली आहे.

आता या वर्षाबद्दल बोलायचं झालं तर मार्चमध्ये बिटकॉइनची किंमत 5800 होती. ऑगस्टमध्ये ती दुप्पट होऊन 12000 वर गेली. केडियाच्या मते, बिटकॉइनसंदर्भात गुंतवणूकदारांमध्ये नेहमीच क्रेझ असतो. आणि आता अशा अनेक घडामोडींमुळे त्याची मागणी आणखी वाढली आहे. (important reasons why gold price reduced continuously)

इतर बातम्या – 

पोस्ट ऑफिस बचत खात्याचे नियम बदलले; तातडीने करा हे काम अन्यथा बसणार ‘एवढा’ दंड

Indias Property Rate | घर खरेदीचा प्लॅन करताय ? मग बघा जगाच्या तुलनेत आपल्याकडे किती स्वस्त? किती महाग ?

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...