आयकर विभागाची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेच्या 53.72 कोटींच्या व्यवहारांवर बंदी, तुमचंही खातं नाही ना?

सीबीडीटीने सांगितले की, आयकर विभागाने गेल्या महिन्यात 27 ऑक्टोबरला बँकेच्या मुख्यालयावर आणि अध्यक्ष आणि संचालकांच्या निवासस्थानावर छापे टाकले होते. अधिकृत निवेदनात मात्र आयकर विभागाने कोणत्या संस्थेवर छापा टाकला हे उघड केले नाही.

आयकर विभागाची महाराष्ट्रातील 'या' बँकेच्या 53.72 कोटींच्या व्यवहारांवर बंदी, तुमचंही खातं नाही ना?
Bank services
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 8:30 PM

नवी दिल्लीः प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील नागरी पत सहकारी बँकेत जमा केलेल्या 53 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर बंदी घातलीय. आयकर विभागाने नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये खाती उघडण्यात “मोठी अनियमितता” समोर आल्यानंतर बँकेवर ही कारवाई केलीय. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) शनिवारी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

कोणत्या संस्थेवर छापा टाकला हे उघड केले नाही

सीबीडीटीने सांगितले की, आयकर विभागाने गेल्या महिन्यात 27 ऑक्टोबरला बँकेच्या मुख्यालयावर आणि अध्यक्ष आणि संचालकांच्या निवासस्थानावर छापे टाकले होते. अधिकृत निवेदनात मात्र आयकर विभागाने कोणत्या संस्थेवर छापा टाकला हे उघड केले नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या संस्थेवर ही कारवाई करण्यात आली आहे, ती संस्था ‘बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक’ आहे.

1200 हून अधिक बँक खाती पॅनकार्डशिवाय उघडण्यात आलीत

CBDT ने एका निवेदनात म्हटले आहे की, “कोअर बँकिंग सोल्युशन्स (CBS) वरील बँक डेटाचे विश्लेषण आणि छाप्यांदरम्यान प्रमुख व्यक्तींच्या स्टेटमेंटच्या विश्लेषणादरम्यान बँक खाती उघडण्यात प्रचंड अनियमितता झाल्याचे उघड झालेय.” सीबीडीटीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, “या शाखेत 1200 हून अधिक बँक खाती पॅनकार्डशिवाय उघडण्यात आलीत. एवढेच नाही तर 1200 हून अधिक बँक खात्यांपैकी 700 हून अधिक अशी खाती ओळखण्यात आली, जी एकाच वेळी उघडण्यात आलीत. ही अशी खाती आहेत, ज्यात खाते उघडल्यानंतर 7 दिवसांत 34.10 कोटींहून अधिक रोख जमा करण्यात आलीय. सीबीडीटीने सांगितले की, या खात्यांमध्ये ऑगस्ट 2020 ते मे 2021 दरम्यान मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले आहेत.

53.72 कोटींच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली

“चौकशीदरम्यान बँकेचे अध्यक्ष, सीएमडी आणि शाखा व्यवस्थापक खात्यात जमा झालेल्या रोखीच्या स्त्रोतांबद्दल योग्य माहिती देऊ शकले नाहीत आणि त्यांनी हे देखील मान्य केले की, बँकेच्या संचालकांपैकी एकाच्या सांगण्यावरून हे केले गेले होते.” निवेदनात म्हटलेय की, ती एक प्रसिद्ध स्थानिक व्यापारी आहे. गोळा केलेले पुरावे आणि रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेंटच्या आधारे आयकर विभागाने बँकेत जमा केलेल्या 53.72 कोटी रुपयांच्या संपूर्ण व्यवहारावर बंदी घातलीय.

संबंधित बातम्या

अबब! या बँकेने 84000 ग्राहकांना न मागता दिले कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मोठी बातमी! आता बांधकामाच्या पूर्णत्वाशिवाय बिल्डरला ताब्याचा दबाव आणता येणार नाही

Income tax department bans Rs 53 crore transactions of Buldhana Urban Cooperative Credit Bank in Maharashtra

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.