सरकारची मोठी घोषणा! आयटी भरला नसेल तर आता दंड भरण्यासाठी तयार रहा
आयटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत यापुढे वाढवता येणार नाही असं सीबीडीटीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयटी रिटर्न (IT Return File) भरण्यासाठी मुदवाढ मिळण्याच्या सर्व करदात्यांना ( Taxpayers ) इच्छेवर पाणी फेरलं आहे. आयटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत यापुढे वाढवता येणार नाही असं सीबीडीटीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे कर विभाग आणि सरकारच्या कामकाजात अडथळा येऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्या करदात्यांनी आयटी भरला नाही त्यांनी अंतिम तारखेच्या आत कर भरणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरण्याची वेळ येऊ शकते. (income tax news cbdt announces penalty on non filling of income tax returns)
म्हणजेच परतावा भरण्यासाठी ज्या करदात्यांनी 10 जानेवारीची अंतिम मुदत चुकली अशा करदात्यांना आता दंड भरावा लागणार आहे. कर भरण्यासाठी आणखी मुदतीची करदाते अपेक्षा करत होते. पण सीबीडीटीकडून ही मुदवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या करदात्यांना रिटर्न भरण्यापूर्वी ऑडिट रिपोर्ट दाखल करावा लागेल तो 15 जानेवारीपर्यंत द्यावा लागणार आहे.
31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्याची केली होती मागणी
आयकर विभाग आयटी रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याच्या अनेक सूचना आल्या होत्या. कारण कोरोनाच्या जीवेघण्या संसर्गामुळे सगळ्यांवर आर्थिक अडचण होती. यामुळे सर्व श्रेणीतील करदात्यांसाठी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात यावी अशी सूचना करण्यात आली होती.
कर भरणाऱ्यांची संख्या वाढली
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी आकडेवारीवरून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कर भरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं समोर आलं आहे. 2019-20 मध्ये तब्बल 5.62 कोटी करदात्यांनी आयटी रिटर्न भरला होता. तर यावर्षी (2020-21) 10 जानेवारीपर्यंत 5.95 आयटीआर दाखल करण्यात आल्या आहेत.
यापुढी तारखा वाढणार नाहीत
सीबीडीटीने दिलेल्या आदेशानुसार, या पुढे जर मुदवाढ दिली तर त्यामुळे परतावा भरण्याची शिस्त आणि वेळेपूर्वी रिटर्न्स भरणाऱ्यांवर अन्याय होईल. यामुळे आर्थिक परिणामही होईल. अंतिम मुदतवाढ दिल्यास कोविडच्या काळात गरिबांना दिलासा देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनाही अडथळा निर्माण होईल. असं सीबीडीटीने म्हटलं आहे. (income tax news cbdt announces penalty on non filling of income tax returns)
संबंधित बातम्या-
रिअल इस्टेट क्षेत्रासाठी 2021 वर्ष ठरणार लाभदायी; 7 मोठे बदल
SBI च्या एफडीवर मिळतोय जास्त फायदा, व्याज दरामध्ये आणखी केली वाढ
(income tax news cbdt announces penalty on non filling of income tax returns)