सर्व विक्रम मोडीत, सर्वात महाग स्‍टॉक एमआरएफ किंवा एल्सिड नव्हे तर…,किंमत 10 लाखांपेक्षा जास्त

Most Expensive Security: एखाद्या कंपनीचा समभाग घेऊन मालकी घेतली जाऊ शकते, त्याला शेअर म्हणतात. त्यामुळे तुम्ही त्या कंपनीचे शेअरहोल्डर बनता. परंतु सिक्योरिटी अधिक व्यापक आहे. त्यात शेअरसह आर्थिक मालमत्तेचे प्रतिनिधित्व केले जाते.

सर्व विक्रम मोडीत, सर्वात महाग स्‍टॉक एमआरएफ किंवा एल्सिड नव्हे तर...,किंमत 10 लाखांपेक्षा जास्त
Share market
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 8:30 AM

Most Expensive Security: भारतीय शेअर बाजारात कधीकाळी एमआरएफ शेअरचे राज्य होते. एमआरएफ शेअर सर्वाधिक महाग शेअर होता. त्याचा विक्रम काही महिन्यांपूर्वी एल्सिड इन्वेस्टमेंट्सने तोडला. परंतु जास्त काळ एल्सिडचा शेअर अव्वल राहू शकला नाही. 10 डिसेंबर रोजी प्रॉपशेयर प्लॅटिना आरईआयटी सर्वात महाग सिक्योरिटी झाला आहे. एल्सिड इन्वेस्टमेंट्सपेक्षा जवळपास पाच पट हा शेअर महाग आहे. त्याची किंमत 10.45 लाख रुपयांवर गेली आहे.

प्रॉपशेअर प्लॅटिना सर्वात महाग सिक्योरिटी झाला आहे. एल्सिड इन्वेस्टमेंट अजूनही सर्वात महाग शेअर आहे. 29 ऑक्टोबर रोजी होल्डिंग कंपनी एल्सिड इन्वेस्टमेंटचा शेअर 2.36 लाख रुपयांवर गेला होता. त्याने एमआरएफचा विक्रम मोडला होता.

शेअर आणि सिक्योरिटीमध्ये काय फरक

एखाद्या कंपनीचा समभाग घेऊन मालकी घेतली जाऊ शकते, त्याला शेअर म्हणतात. त्यामुळे तुम्ही त्या कंपनीचे शेअरहोल्डर बनता. परंतु सिक्योरिटी अधिक व्यापक आहे. त्यात शेअरसह आर्थिक मालमत्तेचे प्रतिनिधित्व केले जाते. त्याला तांत्रिक भाषेत REIT म्हणतात. हा प्रत्यक्षात शेअर नाही. ही एक पूर्णपणे वेगळा एसेट आहे, परंतु त्याच्या युनिट्सचा व्यवहार डीमॅट खात्यातील शेअर्सप्रमाणे केला जातो.

हे सुद्धा वाचा

प्रॉपशेयर प्लॅटिना कंपनीबाबत

सिक्युरिटीज मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज India most expensive security, PropShare Platina REIT dethrones Elcid, MRF with Rs 10.45 lakh priceने मार्च 2024 मध्ये एसएम आरईआयटी नियम अधिसूचित केल्यानंतर परवाना मिळवणारी प्रॉपशेयर प्लॅटिना ही पहिली कंपनी आहे. कंपनीचा 353 कोटी रुपयांचा इश्यू 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. हा इश्यू 1.19 पट ओव्हर सबक्राईब झाला. प्रॉपशेयर प्लॅटिनाची प्रेस्टीज टेक प्लॅटिना मध्ये 246,935 चौरस फूट ऑफिस स्पेस आहे. बेंगळुरूमधील आऊटर रिंग रोडवर स्थित LEED गोल्ड-प्रमाणित ऑफिस बिल्डिंग आहे. प्रेस्टीज ग्रुपने विकसित केलेली ही मालमत्ता यूएस-आधारित तंत्रज्ञान कंपनीला 9 वर्षांच्या नवीन भाडेकरारांतर्गत पूर्णपणे भाड्याने दिली आहे.

देशातील पाच सर्वात महाग शेअर

  1. प्रॉपशेयर प्लॅटिना आरईआयटी : 10,45,000 रुपये
  2. एल्सिड इन्वेस्टमेंट्स : 2,07638 रुपये
  3. एमआरएफ : 1,32,443 रुपये
  4. यमुना सिंडिकेट लिमिटेड : 46,350 रुपये
  5. हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड : 41,686 रुपये

(11 डिसेंबर रोजी असणारे दर)

आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?.
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका...
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका....
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.