रिअल इस्टेट क्षेत्रात भारतात 4.15 अब्ज डॉलरची गुंतवणूक, रिपोर्ट वाचा
भारत परदेशी गुंतवणूकदारांसाठी मोठी बाजारपेठ बनत चालला आहे. नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. कोलिअर्स इंडियाचा हा रिपोर्ट आहे. त्यानुसार 2024 मध्ये एकूण गुंतवणूकदारांमध्ये विशेषत: आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील परदेशी गुंतवणूकदारांचा वाटा एक तृतीयांश होता. यावरून हे स्पष्ट होते की, भारत आता केवळ देशी गुंतवणूकदारांसाठीच नव्हे तर परदेशी गुंतवणूकदारांसाठीही मोठी बाजारपेठ बनत चालला आहे.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट होत चालल्याचं चित्र सध्या दिसत आहे. भारत परदेशी गुंतवणूकदारांसाठी मोठी बाजारपेठ बनत चालला आहे. 2024 मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील खासगी इक्विटी गुंतवणूक 4.15 अब्ज डॉलर होती. ही वार्षिक आधारावर 32 टक्क्यांनी वाढली आहे. या क्षेत्रातील एकूण संस्थात्मक गुंतवणूक 8.9 अब्ज डॉलर्स होती. ही 2007 च्या 8.4 अब्ज डॉलर्सच्या विक्रमाला मागे टाकते. गेल्या वर्षी निवासी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक झाली होती. 45 टक्के गुंतवणूक या क्षेत्रात झाली.
2024 हे वर्ष भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रासाठी खास ठरले. विशेषतः निवासी बाजारात गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे गुंतवले. कोलिअर्स इंडियाच्या अहवालानुसार, निवासी मालमत्तांची वाढती मागणी आणि सरकारच्या सहाय्यक धोरणांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढला आहे.
देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही रस दाखवला. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी एकूण गुंतवणुकीत 37 टक्के योगदान दिले. त्यामुळे या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत निघतील आणि हे क्षेत्र नवा विक्रम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवासी क्षेत्रात तेजी
2024 मध्ये भारतीय निवासी बाजारपेठेतील संस्थात्मक गुंतवणूक 46 टक्क्यांनी वाढून 1.15 अब्ज डॉलरवर पोहोचली. हा आकडा 2023 मधील 78.89 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, गुंतवणूकदार आता भारतीय रिअल इस्टेटकडे एक मजबूत आणि सुरक्षित बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. गुंतवणूकदार या क्षेत्रात गुंतवणुकीत प्रचंड रस दाखवत आहेत.
औद्योगिक कार्यालये, लाऊंज यांसारख्या बांधकामांमध्येही रस
केवळ घरांमध्येच नव्हे, तर औद्योगिक आणि ऑफिस सारख्या क्षेत्रातही गुंतवणूक वाढली आहे. 2024 मध्ये 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली होती, जी 2023 मधील 87.76 दशलक्ष डॉलर्सपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. यावरून कंपन्या भारतात आपला व्यवसाय झपाट्याने वाढवण्यास तयार असल्याचे दिसून येते.
एकूण गुंतवणुकीत विक्रम
भारतीय रिअल इस्टेटमधील एकूण संस्थात्मक गुंतवणूक 2024 मध्ये 6.5 अब्ज डॉलरवर पोहोचली, जी 2023 मधील 5.4 अब्ज डॉलरच्या तुलनेत 22 टक्क्यांनी अधिक आहे. 2020 नंतरचा हा उच्चांकी आकडा आहे.
सरकारी धोरणांचा परिणाम
गोल्डन ग्रोथ फंडचे सीईओ अंकुर जालान म्हणतात की, या यशात सरकारच्या धोरणांचा मोलाचा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेटची मागणी प्रत्येक स्तरावर वाढली असून, देशी-विदेशी गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत.