कोरोनापाठोपाठ भारतावर घोंगावतंय नवं संकट, देशाच्या चिंतेत वाढ
रशिया आणि युक्रेनमधील युद्धमुळे जगावर नवं संकट उभं राहिलं आहे. या युद्धाचा फटका युरोपीय देशांना पडणार आहे. तर या युद्धाचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. भारत आणि रशियामध्ये अनेक करार झाले आहेत. तसंच लष्करी सामर्थ्य वाढविण्यात रशियाने भारताला खूप मदत केली आहे.
मुंबई : कोरोना महामारीनंतर संपूर्ण जग पुन्हा एका नव्या संकटामुळे चिंतेत पडला आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धमुळे जगावर नवं संकट उभं राहिलं आहे. या युद्धाचा फटका युरोपीय देशांना पडणार आहे. तर या युद्धाचा सर्वाधिक फटका भारताला (India) बसणार आहे. भारत आणि रशियामध्ये अनेक करार झाले आहेत. तसंच लष्करी सामर्थ्य वाढविण्यात रशियाने भारताला खूप मदत केली आहे. तर रशियाकडून सर्वाधिक कच्चा तेलाची (crude oil) आयत युरोपीय देशांना होते. युद्धाचा सर्वाधिक परिणाम कच्चा तेलावर झाला आहे. दिवसेंदिवस कच्चा तेलाची किंमत वाढ आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही या युद्धाचा मोठा परिणाम पाहिला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाला युद्ध न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण रशिया हा भारताचा जुना मित्र तर दुसरीकडे महासत्ता. जपानी वित्तीय कंपनी नोमुराने भारताच्या चिंतेत भर टाकणारा रिपोर्ट सादर केलाय…
नोमुराच्या रिपोर्टमध्ये काय आहे?
चालू आर्थिक वर्षासाठी भारताने वित्तीय तूट जीडीपीच्या 6.9 टक्क्यांवर आणली आहे. तर पुढील आर्थिक वर्षासाठी हा अंदाज 6.4 टक्के असणार आहे, असा अंदाज आहे. रशिया आणि युक्रेनचा भारत, थायलंड आणि फिलिपाइन्सच्या अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक खराब परिणाम झाला आहे, असा नोमुराच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. तर भारत हा सर्वाधिक कच्चा तेलाची आयात करतो. कच्चा तेलाची किंमत वाढल्यामुळे भारतावर आर्थिक संकट येऊ शकतं. कच्चा तेलात 10 टक्के वाढ झाल्यामुळे जीडीपीमध्ये 0.20 पॉइंटने घसरेल, असा अंदाज नोमुराने व्यक्त केला आहे. रशिया आणि युक्रेनच्या तणावामुळे गेल्या 7 वर्षात ब्रेंट क्रूड तेलाच्या किंमत पहिल्यांदाच 105 डॉलरवर पोहोचली आहे.
निवडणुकीनंतर पेट्रोल दरवाढ?
सध्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे मोदी सरकारने या पार्श्वभूमीवर दरमहिना होणाऱ्या इंधन आणि गॅसवरील दरवाढ थांबवली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून ही दरवाढ झालेली नाही. आता रशिया – युक्रेनमुळे वाढलेल्या कच्चा तेलाच्या किंमतीचा फटका इंधन आणि गॅस दरवाढीवर बसणार आहे. सर्वसामान्यांवर पुढील महिन्यांपासून ही दरवाढ भोगावी लागणार आहे. निवडणूक पुढील महिन्यात संपणार आहे. तेव्हा प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त इंधन दरवाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
रेपो रेट वाढणार – नोमुरा
हे आर्थिक संकट बघा रिझर्व्ह बँक जून 2022 मध्ये आपला रेपो रेट वाढवू शकते, असं नोमुराचं म्हणं आहे. साधारण 1 टक्क्याने हा रेपो रेट वाढण्याची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेनसोबत भारताची मोठी गुंतवणूक
रशिया आणि युक्रेनसोबत भारत जवळपास 18 अब्ज व्यापार करतो. या युद्धामुळे मालाची वाहतूक, पेमेंट आणि तेलाच्या किमतीवर होणार, असं फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स या निर्यातदार महासंघाचं मतं आहे. भारत आणि रशियामध्ये द्विपक्षीय व्यापार होतो. चालू आर्थिक वर्षात व्यापार आतापर्यंत 9.4 अब्ज इतका आहे. तोच 2020-21मध्ये हा व्यापार 8.1 अब्ज होता.
रशियातून काय आयात होतं? 1. इंधन 2. खनिज तेल 3. मोती 4. मौल्यवान किंवा अर्ध मौल्यवान दगड 5. अणुभट्ट्या 6. बॉयलर 7. यंत्रसामग्री 8. यांत्रिक उपकरणे युक्रेनला काय निर्यात होतं? 1. फार्मास्युटिकल उत्पादने 2. उर्जा यंत्रे आणि उपकरणे 3. सेंद्रिय रसायने 4. वाहने
संबधित बातम्या