AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिमालया’वर गौतम अदानींची नजर, सर्वात मोठ्या प्रकल्पात करणार मोठी गुंतवणूक

भूतान सरकारने रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट्स सुरु करण्यासाठी या भागातील अनेक प्रकल्प पाहिले. 20 गीगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभा करण्यासाठी एक कायमस्वरुपी उर्जा उत्पादन केंद्र बनवण्यात येणार आहे. त्याठिकाणी रस्ते बनवणे, इतर पायाभूत सुविधा निर्माण करणे आदी कामेही करण्यात येणार आहे.

‘हिमालया’वर गौतम अदानींची नजर, सर्वात मोठ्या प्रकल्पात करणार मोठी गुंतवणूक
उद्योगपती गौतम अदानी
| Updated on: Nov 02, 2024 | 9:37 AM
Share

भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी अल्पवधीतच आपल्या उद्योगाचे साम्राज्य वाढवले आहे. त्यांनी देशातच नाही तर परदेशातील अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. आता गौतम अदानी यांची नजर हिमालय असलेल्या भूतान या देशाकडे आहे. गौतम अदानी भारताचा शेजारील देश भूतानमध्ये गेलेफू माइंडफुलनेस सिटीममध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत आहे. भूतान आपल्या दक्षिणी सीमा भागात एक टाउनशिप प्रकल्प सुरु करत आहेत. त्या प्रकल्पावर अदानी समूहाचे लक्ष राहिले आहे.

अदानींना या प्रकल्पात रस

ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये भूतानमधील प्रकल्पाचा उल्लेख करत अदानी समूहाकडून सुरु असलेल्या हालचालींची माहिती दिली आहे. या प्रकल्पाबाबत गेलेफूचे गव्हर्नर लोटे शेरिंग यांनी सांगितले की, भूतान-भारत सीमा रेषेजवळ 1,000 वर्ग किलोमीटरवर टाउनशिप प्रोजेक्टचे काम सुरु आहे. या प्रकल्पात सोलर आणि हायड्रोपॉवर प्लॅट निर्माण करण्यासाठी अदानी समूहासोबत चर्चा सुरु आहे.

भूतान सरकारने रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट्स सुरु करण्यासाठी या भागातील अनेक प्रकल्प पाहिले. 20 गीगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभा करण्यासाठी एक कायमस्वरुपी उर्जा उत्पादन केंद्र बनवण्यात येणार आहे. त्याठिकाणी रस्ते बनवणे, इतर पायाभूत सुविधा निर्माण करणे आदी कामेही करण्यात येणार आहे. त्यासाठी आशियामधील दिग्गजांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करत असल्याचे गेलेफू गव्हर्नर लोटे शेरिंग यांनी सांगितले. एनर्जी प्रोजेक्ट्स आणि हायड्रोपॉवर प्रोजेक्ट्ससोबत एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एक बंदर निर्माण करण्यासाठी बोलणी सुरु आहे.

अदानी ग्रुपचा दबदबा

अदानी ग्रुपसोबत भूतान सरकारची डील झाली तर शेजारील देशांमध्ये अदानी यांचा दबदबा वाढणार आहे. अदानी ग्रुपने यापूर्वीच इस्त्रायल, केनिया, श्रीलंका, बांगलादेश, व्हिएतनाममध्ये आपले प्रकल्प सुरु केले आहेत. भारतातील रिलायन्स उद्योग समूह जगभरात पसरला आहे. अनेक देशांमध्ये रिलायन्सच्या कंपन्या आहेत. त्यानंतर आता अदानी समूहसुद्ध देशाबाहेर आपल्या प्रकल्पांचा विस्तार करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अदानी समूहाची वेगाने भरभराट झाली आहे.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.