भारतीय महिला Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करुन होऊ शकतात करोडपती, जाणून घ्या कारणं?

विशेष म्हणजे केवळ पुरुषच नाही तर स्त्रियाही क्रिप्टो मार्केटमध्ये (Crypto Market) गुंतवणुकीत फार रस घेत आहेत.(Indian crypto market Why are women the better crypto investors know the reasons)

भारतीय महिला Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करुन होऊ शकतात करोडपती, जाणून घ्या कारणं?
Cryptocurrency
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 12:59 PM

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भारतात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) लोकप्रिय ठरत आहे. अनेक किरकोळ गुंतवणूकदारही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहे. विशेष म्हणजे केवळ पुरुषच नाही तर स्त्रियाही क्रिप्टो मार्केटमध्ये (Crypto Market) गुंतवणुकीत फार रस घेत आहेत. भारतीय महिलांसाठी त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य ही फार महत्त्वाची गोष्ट असते. कॉईनस्विच कुबेर (CoinSwitch Kuber) यांच्या अहवालानुसार, जर महिलांनी क्रिप्टो मार्केटमध्ये रस घेतला तर त्या नक्कीच यशस्वी होऊ शकता. (Indian crypto market Why are women the better crypto investors know the reasons)

महिला चांगल्या क्रिप्टो गुंतवणूकदार ठरण्यामागची कारणं काय?

तज्ज्ञांच्या मते, दोन भिन्न घटक महिलांना अधिक चांगले क्रिप्टो गुंतवणूकदार बनवतात. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही महिला ही उत्तम बचतकर्ता म्हणून ओळखली जाते. फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सच्या अभ्यासानुसार, महिला त्यांच्या उत्पन्नाच्या 8.3 टक्के बचत करतात. तर पुरुष हे त्यांच्या उत्पन्नापैकी 7.9 टक्के बचत करतात. अधिक बचत करणाऱ्या महिलांकडे क्रिप्टोकरन्सीसारख्या गुंतवणुकीत विविधता आणण्याची अधिक क्षमता असते.

महिला गुंतवणूकीबाबत अधिक विश्लेषकात्मक

दुसरे म्हणजे कोणतीही महिला अधिक यशस्वी गुंतवणूकदार असते. महिला जवळजवळ प्रत्येक गोष्टीत जोखमीचे मूल्यांकन करतात. तसेच ती जोखीम कशी कमी करता येईल, याचाही सर्वोत्तम मार्ग त्यांच्याकडे असतात. मेरिल लिंच यांच्या संशोधनानुसार, महिला गुंतवणूकदार कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेतात. तसेच त्यात किती जोखीम आहे, याचाही त्या अभ्यास करतात.

त्यामुळेच महिला गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूकीबाबत अधिक विश्लेषकात्मक असू शकतात. क्रिप्टोसारख्या अस्थिर बाजारात गुंतवणूक करताना, त्यांचा सावधपणा त्यांना योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो.

काळजीपूर्वक गुंतवणूक करा

तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. सर्व बाबींवर नीट लक्ष देऊन त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमीत कमी नुकसान होऊ शकतं. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही गुंतवणूकदाराने त्याचा हेतू काय, त्याला दीर्घकाळात गुंतवणूक केल्याने काय फायदा होऊ शकतो, याचा अभ्यास करावा.

(Indian crypto market Why are women the better crypto investors know the reasons)

संबंधित बातम्या : 

फिक्स डिपॉझिटवर ‘या’ 4 बँका देतायत सर्वाधिक व्याज, जाणून घ्या खास ऑफर

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी SBI कडून स्वस्त व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही

अमेरिकेच्या जेबीएल कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.