दिवसाला फक्त 30 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा कोट्याधीश, ‘हे’ आहेत गुंतवणुकीचे उत्तम पर्याय

चांगली गुंतवणूक केली तर चांगला फायदाही होतो. पण कशात गुंतवणूक (Investment) करणं हा मोठा प्रश्न आहे. यामुळे आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय सांगणार आहोत.

दिवसाला फक्त 30 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा कोट्याधीश, 'हे' आहेत गुंतवणुकीचे उत्तम पर्याय
दरम्यान, दुर्दैवाने तुमच्यासोबत काही घडलं तर तुमच्या कुटुंबाला जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर 4 लाख रुपयांचा अपघाती विमा कव्हरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पैशांच्या बचतीमध्येही तुम्ही चांगला नफा कमवू शकता अशी ही योजना आहे.
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 9:49 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे सगळ्यांवरच आर्थिक संकट कोसळलं आहे. अशात आता प्रत्येकालाच भविष्याची चिंता आहे. पण चांगली गुंतवणूक केली तर चांगला फायदाही होतो. पण कशात गुंतवणूक (Investment) करणं हा मोठा प्रश्न आहे. यामुळे आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही लाखोंनी पैसे कमवू शकता. (invest money just rs 30 in sip and this policy make you rich)

तुम्ही 20 वर्षांचे असाल तर दररोज वाचवा 30 रुपये

तुम्ही जर 20 वर्षांचे असाल तर दररोज 30 रुपयांची बचत करून साठव्या वर्षी तुम्ही करोडपती बनू शकता. दिवसाला 30 रुपये ठेव म्हणजे महिन्यात 900 रुपयांची बचत. दरमहा एसआयपी (Systematic Investment Plan) मध्ये रक्कम गुंतवून तुम्ही भविष्यात चांगला नफा मिळवू शकता. याचा अर्थ असा की 40 वर्षांसाठी, दरमहा फक्त 900 रुपये गुंतवून तुम्ही कोट्याधीश होऊ शकता.

समजा तुम्ही 20 वर्षांचे आहात. 40 वर्षांसाठी दररोज 30 रुपयांची बचत केलीत. म्हणजेच दरमहा म्युच्युअल फंडामध्ये 900 रुपयांची गुंतवणूक होते. म्युच्युअल फंडामध्ये सरासरी 12.5 टक्क्याने रिटर्न मिळते. त्यामुळे अशी गुंतवणूक केल्यास 40 वर्षांनंतर तुम्ही कोट्याधीश असाल.

40 वर्षांपर्यंत बचत करणं हा जर लांबचा पल्ला वाटत असेल तर तुम्ही कमी वर्षांसाठीही गुंतवणूक करू शकता. यामध्ये सरासरी परतावा 12 टक्क्यांपर्यंत असू शकतो. जर तुम्ही 35 वर्षांसाठी म्युच्युअल फंडामध्ये डिव्हिडंड रीइन्व्हेस्टमेंट प्लॅन (DRIP) मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 15% रिटर्न मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडांऐवजी तुम्ही छोट्या किंवा मिडकॅप फंडातही गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक 25-30 वर्षांपेक्षाही कमी असते.

RD देखील गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

RD देखील गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. दरमहा 5500 रुपयांची आरडी जमा करुनही तुम्ही कोटींनी कमवू शकता. यासाठी सगळ्यात आधी बँकेत आरडी खातं उघडा आणि दरमहा रक्कम जमा करा. यामध्ये दरवर्षी तुम्हाला 9 टक्के व्याज मिळालं तर फक्त 30 वर्षांत तुम्ही भरभक्कम परतावा मिळवू शकता. (invest money just rs 30 in sip and this policy make you rich)

संबंधित बातम्या –

Fact Check : पुढच्या वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापणार? पाहा खरं आहे की खोटं

दिवसाला फक्त 20 रुपयांच्या बचतीवर मिळवा 2 लाख 65 हजार, खास आहे LIC ची योजना

(invest money just rs 30 in sip and this policy make you rich)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.