Special Story : कमी वेळेत गुंतवणुकीचे असे 6 पर्याय ज्यातून बक्कळ कमवाल

कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य आणि पैशाचं गणित किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच समजलं. खरंतर, गेल्या काही जे काही घडलं त्यामुळे प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अशात अनेकांची पाऊलं आता बचत आणि गुंतवणुकीकडे वळली आहे.

Special Story : कमी वेळेत गुंतवणुकीचे असे 6 पर्याय ज्यातून बक्कळ कमवाल
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 8:53 AM

मुंबई : आर्थिकदृष्ट्या विचार केला तर गेले काही दिवस कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढावली होती. या महामारीमुळे आरोग्य आणि पैशाचं गणित किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच समजलं. खरंतर, गेल्या काही जे काही घडलं त्यामुळे प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अशात अनेकांची पाऊलं आता बचत आणि गुंतवणुकीकडे वळली आहे. यंदाच्या वर्षात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. आम्हीही तुम्हाला याचसंबंधी काही महत्त्वाच्या टीप्स देणार आहोत. (Investment Idea special story best savings and investment ideas for benefit)

सुरक्षित गुंतवणूक आणि कमी पैशांत जास्तीत जास्त नफा देणाऱ्या असंख्य योजना बाजारात आहे. पण यात नेमक्या कुठल्या योजने गुंतवणूक करणं उत्तम आहे, याचीच माहिती या स्पेशल रिपोर्टमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कमी दिवसांमध्ये जास्त नफा मिळवण्याचा तुमचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

आता छोट्या कालावधीच्या गुंतवणुकीविषयी बोलायचं झालं तर यामध्ये एफडी (फिक्स्ड डिपॉझिट), कॉर्पोरेट एफडी, पोस्ट ऑफिस डिपॉझिट, रिकर्निंग डिपॉझिट (RD), लिक्विड फंड आणि स्वीप-इन फिक्स्ड डिपॉझिट असे अनेक पर्याय आहेत. आम्ही तुम्हाला अल्प मुदतीच्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय सांगणार आहोत.

बँक एफडी

अशा अनेक बँका आहेत जिथे मुदत ठेवींवर चांगलं उत्पन्न मिळतं. बर्‍याच बँकांमध्ये आपण मुदत ठेवींवर चांगले उत्पन्न मिळवू शकता. आपली गुंतवणूक ही चलनवाढीच्या दरापेक्षा वेगाने वाढत आहे की नाही हे पाहणं प्रत्येक गुंतवणूकदारासाठी महत्त्वाचं आहे. बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणं यासाठी चांगलं आहे कारण यामध्ये भांडवल सुरक्षित असतं आणि गुंतवणुकीची पूर्तताही वेळेवर केली जाते. बँक एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरवर्षी ठरलेल्या व्याजानुसार परतावा मिळतो.

लिक्विड फंड

तुम्हाला कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी लिक्विड फंड उत्तम पर्याय असू शकतो. हल्लीची तरुणाई या गुंतवणुकीला जास्त पसंती देते. खरंतर, हा एक डेट म्युच्युअल फंड आहे. या फंडामध्ये 91 दिवसांच्या मॅच्युरिटी कालावधीसह उपकरणांमध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये गुंतवणूकदार सहसा 1 दिवस ते 3 महिने गुंतवणूक करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला मुलांच्या शाळेची फी जमा करण्याआधी तुम्ही ती या फंडमध्ये ठेवू शकता. इतकंच नाही तर जर तुम्हाला दोन महिन्यांनंतर कुटूंबासोबत फिरायला जायचं असेल तर त्याचेही पैसेही तुम्ही या फंडमध्ये गुंतवू शकता.

लिक्विड फंड गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे कारण यामध्ये अचानक मोठी रक्कम मिळते. म्हणजेच तुम्हाला मिळालेला बोनस, मालमत्तेची विक्री किंवा कुठल्याही प्रकारे मिळालेलं सेकेंड इनकम. खरंतर, इक्विटी फंडात गुंतवणूक करणारे बरेच लोक लिक्विड फंडात गुंतवणूक करतात. यानंतर ते हळूहळू एसटीपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये हे पैसे गुंतवतात. या पद्धतीमुळे अधिकच परतावा मिळतो.

कॉर्पोरेट एफडी

मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत जे कामांच्या गरजा भागवण्यासाठी कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर करतात. या कंपन्या एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूकदाराकडून भांडवल घेते ज्याला कॉर्पोरेट एफडी असं म्हणतात. यामध्ये चांगलं व्याजदर मिळतं म्हणून गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात.

पोस्ट ऑफिस डिपॉझिट

लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत गुंतवणुकीचे आणि बचतीचे उत्तम पर्याय तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळतात. म्हणजेच काय तर कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करू शकते. इतं वार्षिक व्याज दर दिलं जातं दर तिमाहीची गणनादेखील केली जाते. इथे तुम्ही अगदी कमी पैशात आणि कमी कालावधीसाठीही उत्तम गुंतवणूक करू शकता.

रिकर्निंग डिपॉझिट (RD

प्रत्येक महिन्याला थोड्या रक्कमेसह पैसे जमा करणारा हा प्लान एक प्रकारे टर्म डिपॉझिट आहे. यासाठी प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. गुंतवणुकीचा हादेखील एक उत्तम पर्याय असल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं. नोकरी किंवा रोजचं इनकम असलेल्या लोकांसाठी बचत करण्याची ही चांगली योजना आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या पैशांतून बचतीचे पैसे जमा करू शकता आणि यामध्ये व्याज मिळवू शकता. सगळ्यात खास म्हणजे यामध्ये एफडी प्रमाणे व्याजही दिलं जातं.

स्वीप-इन FD

समजा तुमच्या एखाद्या बँक खात्यामध्ये पैसे राहिले असतील तर बँक तुम्हाला हे पैसे एफडीमध्ये रुपांतरित करण्याचा पर्याय देते. यालाच स्वीप-इन FD म्हणतात. ही एफडी बचत खात्याशी जोडलेली असते ज्यामध्ये तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढू शकता.

म्हणजेच जर बचत खात्यामध्ये आवश्यक रकमेपेक्षा जास्त पैसे असतील तर बँक खातेदाराच्या परवानगीने ती रक्कम एफडीमध्ये वळवते. या बचत खात्यातून तुम्हाला अधिक व्याज मिळू शकतं. अनेक बँका तर मुदत ठेवींप्रमाणे व्याज देते. (Investment Idea special story best savings and investment ideas for benefit)

संबंधित बातम्या – 

Special Story | लसीकरणाची नांदी आणि अर्थव्यवस्थेची घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणूक ठरणार का फायदेशीर?

(Investment Idea special story best savings and investment ideas for benefit)

(महत्त्वाची सूचना : कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.