ITI Conservative Hybrid Fund लाँच, जाणून घ्या काय आहेत ऑफर्स, 7 मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी

आयटीआय कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंडासाठी (ITI Conservative Hybrid Fund) गुंतवणूकदार किमान 5 हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह अर्ज करू शकतात. यानंतर एका रुपयांच्या पटीने गुंतवणूक केली जाऊ शकते.

ITI Conservative Hybrid Fund लाँच, जाणून घ्या काय आहेत ऑफर्स, 7 मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी
Mutual Fund
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 11:31 AM

मुंबई : म्युच्युअल फंड कंपन्यांतर्फे यंदाच्या वर्षी विविध नवीन फंड आणले जात आहेत. मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या आयटीआय (ITI) म्युच्युअल फंडाने आयटीआय कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड आणला आहे. ही एक ‘ओपन-एंडेड हायब्रिड स्कीम’ आहे, कर्ज साधनांमध्ये आणि निफ्टी 50 इंडेक्स स्टॉकमध्ये यामार्फत गुंतवणूक (Investmen) होते. याचा न्यू फंड ऑफर (NFO) 21 फेब्रुवारी रोजी सादर झाला आहे. तर 7 मार्च 2022 रोजी तो बंद होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. या फंडाचे व्यवस्थापन विक्रांत मेहता आणि प्रदीप गोखले करीत आहेत. हा फंड कर्ज आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समधील गुंतवणुकीद्वारे नियमित उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असून त्याच बरोबर, फंड इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांच्या मर्यादित प्रदर्शनाद्वारे भांडवल निर्माण करणार असल्याचे आयटीआय म्युच्युअल फंडाने सांगितले आहे. दरम्यान, योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे कोणतेही आश्वासन देता येत नसल्याचेही फंडाने सांगितले आहे.

हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय?

हायब्रिड फंड ही एक म्युच्युअल फंड योजना आहे जी इक्विटी आणि कर्ज दोन्हीमध्ये गुंतवणूक करते. जर तुम्हाला मार्केटमध्ये कमी जोखीम घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हायब्रीड फंडांमध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय आहे. कारण, यामध्ये कमी जोखमीसोबतच परतावाही जास्त असतो. यामध्ये अग्रेसिव्ह हायब्रीड, कंझर्व्हेटीव्ह हायब्रीड, डायनेमिक एसेट अलोकेशन, मल्टी असेट अलोकेशन, आर्बिट्राज आणि इक्विटी सेव्हिंग स्कीम योजनांचा समावेश आहे. गुंतवणूकदार आयटीआय कंझर्व्हेटिव्ह हायब्रीड फंडासाठी किमान पाच हजार रुपयांपासून गुंतवणुकीसह अर्ज करू शकतात. नवीन ‘एनएफओ’ची घोषणा करताना, आयटीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी जॉर्ज हेबर जोसेफ म्हणाले, की, आम्ही गुंतवणूकदारांना आयटीआय कंझर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड ऑफर करताना उत्सूक आहे. प्रामुख्याने पारंपारिक बचत उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्यांसाठी हा फंड उत्तम परतावा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुंतवणूक कुठे होईल?

हेबर म्हणाले की, फंडाची किमान 75 टक्के गुंतवणूक उच्च दर्जाच्या कर्ज रोख्यांमध्ये असेल आणि उर्वरित गुंतवणूक निफ्टी 50 इंडेक्सशी संबंधित कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये केली जाईल. 31 जानेवारी 2022 पर्यंत फंड हाउसची सध्याची एयुएम 2,661 कोटी रुपये आहे. एकूण एयुएम पैकी इक्विटी एयुएम 1,869 कोटी रुपये आहे, तर संकरित आणि कर्ज योजनांचे अनुक्रमे 580 कोटी आणि 212 कोटी रुपये आहेत. पाच मोठ्या शहरांमध्ये एयुएम मधील 38.252 टक्के, पुढील 10 शहरांमध्ये 23.70 टक्के, पुढील 20 शहरांमध्ये 18.18 टक्के, पुढील 75 शहरांमध्ये 15.15 टक्के आणि इतरांमध्ये 4.72 टक्के वाटा आहे.

इतर बातम्या : 

पॉलिसी मॅच्युरिटीनंतर किती कर द्यावा लागतो? आयुर्विम्याबाबत जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी

कच्च्या तेलाचा भडका, भाव 100 डॉलरच्या उंबरठ्यावर, पेट्रोल सव्वाशेपार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.