Mutual Fund | म्युच्युअल फंड: महिन्याला हजार गुंतवा, 20 वर्षांत लखपती व्हा!
नव्या वर्षात नक्कीच गुंतवणुकीचा श्रीगणेशा करा. प्रति महिना एक हजार रुपये एसआयपीत गुंतवा. वर्ष 2022 मध्ये एक हजारांत म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करा. तुम्ही बँकेतून उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या रिटर्नमुळे सहजशक्य ठरते.
नवी दिल्ली : तुम्ही दर महिन्याला 1 हजारांची रुपयांची बचत करू शकत नाही? अधिकांश लोकांसाठी एक हजार रुपये मोठी रक्कम असू शकत नाही. कॉलेजात जाणारे तरुणही आपल्या पॉकेटमनीची बचत करुन एक हजार रुपये वाचवू शकतात. गाव असो की शहर महिन्याला एक हजारांची बचत करणे सहज शक्य आहे.
तुम्ही एक हजार रुपयांची बचत करण्यास सक्षम असाल तर हजाराचे कोटी निश्चितच करू शकतात. गुंतवणुकीद्वारे सहज शक्य आहे. अनेकांसाठी ही अशक्यप्राय बाब ठरते. मात्र, गुंतवणुकीचे अशी काही माध्यमे उपलब्ध आहेत. ज्याद्वारे तुम्ही निश्चितच उद्दिष्ट गाठू शकतात.
नव्या वर्षात नवी सुरुवात:
नव्या वर्षात नक्कीच गुंतवणुकीचा श्रीगणेशा करा. प्रति महिना एक हजार रुपये एसआयपीत गुंतवा. वर्ष 2022 मध्ये एक हजारांत म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करा. तुम्ही बँकेतून उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या रिटर्नमुळे सहजशक्य ठरते. गेल्या दोन दशकांत म्युच्युअल फंडवर आकर्षक रिटर्न मिळाले आहेत.
गुंतवणुकीचा प्लॅन 20:
तुम्ही प्रति महिना एक हजार रुपये 20 वर्षांसाठी गुंतवणूक करत असल्यास त्यावर वार्षिक 12% रिटर्न प्राप्त होतो. तुम्हाला 20 वर्षानंतर अंदाजित 10 लाख रुपये मिळतील. तुम्हाला 20% रिटर्नच्या अंदाजाने वर्षाला 31 लाख 61 हजार रुपये प्राप्त होतील.
गुंतवणुकीचा प्लॅन 30:
गुंतवणुकीची सुरुवात लवकर केल्यास निश्चितच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. तरुण वयात आरंभ केल्यास व्यक्ती 30 वर्षापर्यंत निश्चितच गुंतवणूक करू शकतो. प्रति महिना एक हजार रुपयांच्या एसआयपीवर 12% रिटर्नने 35 लाख रुपये प्राप्त होताता. तर 15% रिटर्नने 70 लाखांपर्यंतचे पैसे मिळू शकतात.
चक्रवाढ वृद्धी:
म्युच्युअल फंडवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळतो. प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीची सुविधा प्राप्त होते.तुम्ही म्युच्युअल फंडवर किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्कीच घ्या. अपुऱ्या माहितीविना केलेली गुंतवणूक जोखमीत टाकू शकते.