वडील विकायचे फळं, मुलाने बनवलं ‘नॅचरल्स आईस्क्रीम’; उभारला 300 कोटींचा व्यवसाय

Naturals ice cream | 14 फेब्रुवारी 1984 रोजी रघुनंदन यांनी जुहू परिसरात Naturals Ice Cream, Mumbai या नावाने पहिले आऊटलेट सुरु केले. या भागात अनेक उच्चभ्रू लोक राहत असल्याने त्यांनी व्यवसायासाठी या परिसराची निवड केली.

वडील विकायचे फळं, मुलाने बनवलं 'नॅचरल्स आईस्क्रीम'; उभारला 300 कोटींचा व्यवसाय
नॅचरल्स आईस्क्रीम
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 2:48 PM

मुंबई: आईस्क्रीमचं नाव काढलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. खवय्यांमध्ये व्हॅनिला, स्ट्रॉबेरी या पारंपरिक फ्लेवर्समधून अलीकडे आलेल्या नवे आईस्क्रीम फ्लेवर्स चांगलेच लोकप्रिय आहेत. भारतामध्ये आईस्क्रीमचं नाव निघालं की नॅचरल्स आईस्क्रीम हे नाव आपसुकच अनेकांच्या ओठावर येतं. अस्सल फळांचा स्वाद आणि अनुभूती देणारी नॅचरल्स आईस्क्रीम अनेकांच्या पसंतीस उतरले आहे.

नॅचरल आईस्क्रीमच्या उभारणीचा प्रवासही रंजक आहे. रघुनंदन एस. कामथ हे नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक आहेत. मुंबईत अगदी लहानशा आईस्क्रीमच्या दुकानापासून ते 300 कोटी रुपयांचा व्यवसाय अशी मोठी झेप त्यांनी घेतली. आजघडीला भारतातील अनेक शहरांमध्ये नॅचरल्स आईस्क्रीमचे पार्लर्स आणि दुकानं सर्रासपणे आढळून येतात.

वडिलांचा फळविक्रीचा व्यवसाय

रघुनंदन एस. कामथ यांचा जन्म कर्नाटकच्या पुत्तुर तालुक्यातील मुलकी या लहानशा गावात झाला. त्यांचे वडील फळशेती आणि विक्रीचा व्यवसाय करायचे. सात भावंडांमध्ये रघुनंदन हे सर्वात लहान होते. 1966 साली रघुनंदन मुंबईत आपल्या भावांकडे राहायला आले. त्यानंतर रघुनंदन यांनी गोकुळ या नावाने एक लहानसा फुड स्टॉल सुरु केला. याठिकाणी ते ईडली, डोसा आणि आईस्क्रीम विकायचे.

आईस्क्रीम पार्लरचा व्यवसाय

रघुनंदन यांना आईस्क्रीमच्या व्यवसायात स्वत:ची ओळख निर्माण करायची होती. 1983 साली लग्न झाल्यानंतर त्यांनी मुंबईतच एक लहानसे आईस्क्रीम पार्लर सुरु केले. त्याकाळी आईस्क्रीम म्हणजे महागडी आणि उच्चवर्गीयांमध्ये लोकप्रिय असलेली गोष्ट होती. तसेच बाजारपेठेत अगोदरपासूनच प्रस्थापित ब्रँडसची आईस्क्रीमस होती. मात्र, रघुनंदन यांनी जोखीम पत्कारत आईस्क्रीमचा व्यवसाय सुरु केला.

14 फेब्रुवारी 1984 रोजी रघुनंदन यांनी जुहू परिसरात Naturals Ice Cream, Mumbai या नावाने पहिले आऊटलेट सुरु केले. या भागात अनेक उच्चभ्रू लोक राहत असल्याने त्यांनी व्यवसायासाठी या परिसराची निवड केली. मात्र, सुरुवातीच्या काळात लोक याठिकाणी फिरकत नव्हते. तेव्हा रघुनंदन यांनी त्याठिकाणी पावभाजीचाही व्यवसाय सुरु केला. अशाप्रकारे त्यांच्या व्यवसायाला सुरुवात झाली.

आईस्क्रीमच्या उत्तम दर्जासाठी आग्रही

रघुनंदन यांनी सुरुवातीपासूनच आपल्या आईस्क्रीमचा दर्जा उत्तम राहील, याची काळजी घेतली. त्यांनी फळं, दूध आणि साखरेपासून आईस्क्रीम बनवायला सुरुवात केली. आईस्क्रीममध्ये असणारी फळांची अस्सल चव हा आजदेखील Naturals Ice Cream चा युएसपी आहे. सुरुवातीला रघुनंदन हे केवळ आंबा, चॉकलेट, सीताफळ, काजूद्राक्ष आणि स्ट्रॉबेरी या पाच फ्लेवर्सची आईस्क्रीम तयार करायचे. पावभाजीसोबत आईस्क्रीम विकण्याची त्यांची शक्कल चांगलीच उपयोगी पडली. त्यानंतर रघुनंदन यांनी हा व्यवसाय वाढवत नेला. तरीही रघुनंदन यांच्या मनात आईस्क्रीमचा स्वत:चा असा एक ब्रँड तयार करायचा, ही इच्छा होतीच. अखेर त्यांनी 1985 मध्ये पावभाजीचा व्यवसाय गुंडाळला आणि त्याठिकाणी फक्त आईस्क्रीम पार्लरच सुरु ठेवले.

बाजारपेठेतील स्पर्धेशी सामना

एव्हाना रघुनंदन यांचे आईस्क्रीम पार्लर चांगल्याप्रकारे चालायला लागले होते. मात्र, त्यांच्यासमोर बाजारपेठेतील इतर प्रस्थापित कंपन्यांचे आव्हान होते. जुहू परिसरातील अनेक सेलिब्रिटी त्यांचे नियमित ग्राहक होते. हे सेलिब्रिटी परदेशातून फिरून आल्यानंतर आपण त्याठिकाणी कोणकोणत्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम खाल्ले, हे रघुनंदन यांना सांगत.

हे सर्व सल्ले ऐकून रघुनंदन यांनी आपल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये कोकोनट, जांभूळ हे नवे फ्लेवर्स ठेवायला सुरुवात केली. या फळांवर प्रक्रिया करुन ते आईस्क्रीममध्ये वापरणे त्याकाळी सोपी बाब नव्हती. मात्र, रघुनंदन यांनी सर्व आव्हानांवर मात करत आईस्क्रीमचे नवीन फ्लेवर्स तयार केले.

आईस्क्रीम तयार करण्यासाठी यंत्र

रघुनंदन यांनी या काळात फळांच्या प्रोसेसिंगसाठी खास यंत्र तयार करुन घेतले होते. त्यामुळे त्यांच्या आईस्क्रीमचे उत्पादन आणि व्यवसाय वेगाने वाढायला लागला. फ्रेंजायजीसच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाचा पसारा हळूहळू वाढायला सुरुवात झाली. आजदेखील नॅचरल्सचे आईस्क्रीम हे चव आणि दर्जासाठी ओळखले जाते. आज देशभरात Naturals Ice Cream ची 135 आऊटलेटस आहेत. याठिकाणी जवळपास 20 फ्लेवर्सचे आईस्क्रीम मिळते.

(Journey of Naturals ice cream Raghunandan kamath)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.