Electric scooter : केवळ 15 हजार भरा आणि घरी आणा ‘ही’ आकर्षक स्कूटर, काय आहे ऑफर जाणून घ्या…

36 महिन्यांसाठी, ग्राहकांना 3,959 रुपये इएमआय म्हणजेच मासिक हप्ता भरावा लागेल. Ather 450X प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरसाठी कर्ज काढल्यावर ग्राहकांना त्यावर सुमारे 20,000 रुपये व्याज द्यावे लागेल.

Electric scooter : केवळ 15 हजार भरा आणि घरी आणा ‘ही’ आकर्षक स्कूटर, काय आहे ऑफर जाणून घ्या...
आकर्षक स्कूटर
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 11:25 PM

Ather Energy कंपनीच्या Ather 450X या  स्कूटरने भारतातील प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. उत्तम लुक आणि अत्याधुनिक फीचर्ससोबत असलेली ही स्कूटर ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. ग्राहक ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 15 हजार रुपयांचे डाउनपेमेंट देऊन घरी आणू शकता. त्याच बरोबर सुलभ कर्जाच्या माध्यमातूनही स्कूटर खरेदी केली जाऊ शकणार आहे. पेट्रोल व डिझेलचे वाढते दर पाहता सध्या भारतीय दुचाकी बाजारामध्ये इलेक्ट्रिक सेगमेंटच्या स्कूटर्सना मागणी वाढली आहे. इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी साहजिकच ग्राहकदेखील इलेक्ट्रीक स्कूटरला अधिक पसंती देत आहेत. भारतात दर महिन्याला इलेक्ट्रिक स्कूटर्सची चांगली विक्री होत आहे. बजाज, टीव्हीएस (TVS) आणि ओला इलेक्ट्रिकच्या (Ola Electric) तुलनेत Ather Energy ने प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) सेगमेंटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. Ather 450X स्कूटरमध्ये आकर्षक लूक, नवीन फीचर्स, उत्तम बॅटरी बॅकअप आणि स्पीड आदींमुळे या स्कूटरला चांगली मागणी आहे. स्कूटरच्या एकूण किमतीच्या फक्त 10 टक्के, म्हणजेच 15,000 रुपयांपेक्षा कमी डाउनपेमेंट भरुन तुम्ही ही स्कूटर घरी आणू शकणार आहात.

5 कलर पर्यायांमध्ये उपलब्ध

Ather 450 सीरीज इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450X ची किंमत 1.38 लाख रुपये आणि Ather 450 Plus ची किंमत 1.19 लाख रुपये आहे. Ather 450X 2.9 kwh बॅटरीने सुसज्ज आहे. मिंट, ब्लॅक आणि व्हाईटसह एकूण 5 कलर पर्यायांमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. ग्राहक ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 116 किमी पर्यंत चालवू शकतात. Ather 450X चा टॉप स्पीड 80 kmph पर्यंत आहे. Ather 450X स्पोर्टी लूक आणि अनेक फीचर्ससह उपलब्ध आहे.

9.7 टक्के व्याजदर

दरम्यान, Ather Energy च्या प्रीमियम इलेक्ट्रिक Ather 450X ची किंमत 1,38,005 रुपये एक्सशोरूम असून ही स्कूटर 1,38,235 रुपयांमध्ये ऑन-रोड उपलब्ध आहे. ही स्कूटर ग्राहक केवळ 15 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटवर घरी नेऊ शकणार आहेत. BikeDekho इएमआय कॅल्क्युलेटरनुसार, Ather 450X ला 15,000 रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर ग्राहकांना 9.7 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी 1,23,235 रुपये कर्ज उपलब्ध होणार आहे. यानंतर पुढील 36 महिन्यांसाठी, ग्राहकांना 3,959 रुपये इएमआय म्हणजेच मासिक हप्ता भरावा लागेल. Ather 450X प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरसाठी कर्ज काढल्यावर ग्राहकांना त्यावर सुमारे 20,000 रुपये व्याज द्यावे लागेल.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.