GOLD PRICE TODAY: सोन्याची 50 हजारी घौडदोड, मुंबईसह महाराष्ट्रात सोनं महागलं; आजचे भाव काय?

राजधानी मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46400 व 24 कॅरेट सोन्याला 50620 रुपये भाव मिळाला. सोन्यानं पन्नास हजारांचा टप्पा पार केल्याने सोने गुंतवणुकदारांच्या (GOLD INVESTOR) आशा पल्लवित झाल्या आहेत.

GOLD PRICE TODAY: सोन्याची 50 हजारी घौडदोड, मुंबईसह महाराष्ट्रात सोनं महागलं; आजचे भाव काय?
सोन्याचे दर
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 6:34 PM

मुंबई : सोन्याच्या भावात घौडदोडीचे सत्र कायम आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आज (मंगळवारी) सोन्याच्या भाव पन्नास हजारांच्या पलीकडे कायम राहिला. मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या भावात सरासरी 100 रुपयांची भाववाढ दिसून आली. राजधानी मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46400 व 24 कॅरेट सोन्याला 50620 रुपये भाव मिळाला. सोन्यानं पन्नास हजारांचा टप्पा पार केल्याने सोने गुंतवणुकदारांच्या (GOLD INVESTOR) आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याची भाववाढ दिसून येत आहे. शेअर्स बाजारातील अस्थिरता (SHARE MARKET), आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थघडामोडी यामुळे गुंतवणुकदारांत अस्थिरतेचं वातावरण दिसून येतं आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीकडे अनेकांनी आपला मोर्चा वळविला आहे. आगामी काही दिवसांत भाववाढ कायम राहील अशा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.

देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :

• मुंबई- 50,620 रुपये

• पुणे- 50,550 रुपये

• नागपूर- 50,610 रुपये

• नाशिक- 50,550 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):

• मुंबई- 46,400 रुपये

• पुणे- 46,350 रुपये

• नागपूर- 46,400 रुपये

• नाशिक- 46,350 रुपये

गुंतवणुकदारांचा मोर्चा ‘सोन्या’कडं?

शेअर बाजाराला मोठ्या पडछडीला सामोरे जावं लागलं आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेक जण सोन्याला पहिली पसंती देतात. शेअर बाजारातील अस्थिरता, आजवरच्या सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याचे पडसाद सोने बाजारावर दिसून येत असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Gold Exchange: अखेर ट्रेडिंगला मुहूर्त; सेबीचे नियम जाहीर, सोमवार ते शुक्रवार ईजीआर सेगमेंट मध्ये ट्रेडिंग

Sagar Patidar | शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे स्टार्टअप

एबीजी महाघोटाळा मनमोहन सरकारचं पाप, यूपीए काळातच खाती NPA; निर्मला सीतारमणांचा दावा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.