Gold price Today : सोन्यात गुंतवणूक करायची? जाणून घ्या- मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांतील आजचे भाव

राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49830 व 22 कॅरेट सोन्याला 45900 रुपये भाव मिळाला. कालच्या (मंगळवार) तुलनेत आज मुंबईत 150 रुपये भाववाढ नोंदविली गेली.

Gold price Today : सोन्यात गुंतवणूक करायची? जाणून घ्या- मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांतील आजचे भाव
gold
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 5:44 PM

नवी दिल्ली- कोविड काळात गुंतवणूकदार बाजाराच्या अस्थिरतेचा सामना करत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेकांचा सोने गुंतवणुकीकडे (Gold Investment) वाढता कल आहे. गेल्या काही दिवसांत सोने खरेदीत मागणी वाढली आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याची भाववाढ (Maharashtra Gold Rate) दिसून आली. मुंबईसह प्रमुख शहरात आज (बुधवारी) सरासरी 100 रुपयांची वाढ नोंदविली गेली. राजधानी मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49830 व 22 कॅरेट सोन्याला 45900 रुपये भाव मिळाला. कालच्या (मंगळवार) तुलनेत आज मुंबईत 150 रुपये भाववाढ नोंदविली गेली. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर :

• मुंबई- 49830 रुपये (रु.150वाढ) • पुणे- 49910 रुपये (रु.10वाढ) • नागपूर- 49830 रुपये (रु.100वाढ) • नाशिक- 49910 रुपये (रु.10वाढ)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर:

• मुंबई- 45900 रुपये (रु.150वाढ) • पुणे- 45760 रुपये(रु.10वाढ) • नागपूर- 45900 रुपये(रु.50वाढ) • नाशिक- 45760 रुपये(रु.10वाढ)

आर्थिक तज्ज्ञांचं भाकीत:

सोने गुंतवणूक सुरक्षिततेचा पर्याय मानला जातो. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भाववाढीचा आलेख उंचावला होता. दरम्यान, सोने खरेदीकडे वाढता कल तसेच आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे अर्थतज्ज्ञांची सोने 55 हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत व्यक्त केले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सोने भाववाढीचा आलेख चढाच राहिला आहे.

सोन्याचे भाव एका मिस्ड् कॉलवर:

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याची शुद्धता ‘अ‍ॅप’ वर?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).

OYOचा IPO लवकरच बाजारात, बीएसई, एनएसई मध्ये लवकरच समावेश, मंजुरी मिळाली

Investment Planning | डिव्हिडंड फंड की ग्रोथ फंड, दोघांमध्ये कोण आहे बेस्ट? जाणून घ्या!

पीएमसी इतिहासजमा; युनिटी स्मॉल फायनान्स बँकेशी ग्राहकांचे नवे नाते, विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.