Share Market : Exit Pollचा बूस्टर, तेजीचे सलग 2 दिवस; सेन्सेक्स 1223 अंकांनी वधारला

आज प्रमुख निर्देशांकात (Sensex and nifty) 2 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. बुधवारच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 1223 अंकांच्या वाढीसह 54,647 वर आणि निफ्टी 332 अंकांच्या वाढीसह 16345 वर पोहोचला.

Share Market : Exit Pollचा बूस्टर, तेजीचे सलग 2 दिवस; सेन्सेक्स 1223 अंकांनी वधारला
शेअर बाजारात नेमकं काय घडतंय?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 6:06 PM

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन वादासह पाच राज्यांच्या विधानसभांच्या एक्झिट पोलचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारावर उमटले. रिलायन्स इंडस्ट्री सहित प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी नोंदविली गेली. कालप्रमाणेच आज (बुधवारी) शेअर बाजार (stock market today) तेजीसह बंद झाला. आज प्रमुख निर्देशांकात (Sensex and nifty) 2 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. बुधवारच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 1223 अंकांच्या वाढीसह 54,647 वर आणि निफ्टी 332 अंकांच्या वाढीसह 16345 वर पोहोचला. शेअर बाजारात मेटल (Metal) सेक्टर वगळता अन्य सेक्टर इंडेक्स मध्ये तेजी नोंदविली गेली. सर्वाधिक वाढ मीडिया आणि रिटेल सेक्टरमध्ये दिसून आली. रशिया-युक्रेन संकटाचं निवळणार वातावरण व आंतरराष्ट्रीय वाढीव तेल किंमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम दिसत नसल्याने बाजारात शेअर खरेदीचा ओघ वाढल्याचा अंदाज जाणकरांनी वर्तविला आहे.

आजचे वधारणीचे शेअर्स (TODAYS TOP GAINERS):

• एशियन पेंट्स (5.56%) • रिलायन्स ( 5.31%) • बजाज फायनान्स (5.04%) • एम अँड एम (4.88%) • इंड्सइंड बँक (4.12%)

आजचे घसरणीचे शेअर्स (TODAYS TOP LOOSERS)

• श्री सिमेंट (-2.74%) • ओएनजीसी (-2.07%) • पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (-2.00%) • एनटीपीसी (-1.68%) • कोल इंडिया (-1.32%)

बाजारातील तेजीमागचा फॅक्टर:

शेअर बाजारातील तेजीचं मुख्य कारण रशिया-युक्रेन संकटातील तणाव कमी होणे मानलं जातं. ज्यामुळे सध्या शेअर बाजारात नीच्यांकी स्तरावर पोहोचलेल्या स्टॉक्सच्या खरेदीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. यूरोपात तेल तुटवड्याच्या संकटामुळे डिझेल मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक्स मोठ्या प्रमाणात तेजी नोंदविली गेली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदविली गेली. पाच राज्यांच्या विधानसभेचे एक्झिट पोल भाजपला अनुकूल असल्याचं चित्र आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांत धोरण स्थिरतेबाबत अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.

रशिया डाउन, यूपी अप!

रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेडचे व्हाईस चेअरमन-रिसर्च अजित मिश्रा यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर बाजाराचे स्थिरतेचं गणित अवलंबून असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन वादाकडं देखील सर्वांचं लक्ष असणं अपेक्षित आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्चला घोषित होणार आहेत. या निकालानंतर शेअर बाजारातील कामगिरी ठरणार असल्याचे मिश्रा यांनी आपल्या निरिक्षणात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

54 हजारांचा टप्पा पार! मुंबईसह महाराष्ट्रात सोनं महागलं, जाणून घ्या- ताजे भाव

EPFO ची पुन्हा गुंतवणुकीसाठी खासगी क्षेत्रात धाव एचडीएफसीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

या आठवड्यात जनतेवर फुटणार दरवाढीचा बॉम्ब, पेट्रोल-डिझेलच्या किंमती 15 रुपयांनी वाढण्याची शक्यता

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.